संभाजी महाराजांच्या जीवनावर चित्रपट आणण्याचा विचार

 

अभिनेते, राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्याशी संवाद

 

नाशिक (Nashik) : अश्‍विनी पांडे

छत्रपती संभाजी महाराजांवर सिनेमा काढण्याची इच्छा असून, येत्या तीन वर्षात भव्य दिव्य स्वरूपात मोठ्या पडद्यावर कलाकृती आणण्याचा विचार आहे. असे राष्ट्रवादीचे खासदार व मराठी अभिनेते (Amol kolhe)अमोल कोल्हे यांनी सांगितले.

येत्या  21 ते 26 जानेवारी रोजी शिवपुत्र संभाजी हे महानाट्य तपोवनातील मोदी मैदानावर होणार आहे. त्यानिमित्ताने ते शहरात आले असता  त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

छत्रपती शिवाजी महाराज आणि  छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहास देशपातळीवर पोहचला तरच गडकिल्लयांचे संर्वधन होईल, आणि आपल्या  राजाचा इतिहास नवीन  पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी आपणच सर्वांनी आपापल्या पातळीवर  प्रयत्नशिल असायला हवे.

सध्या राजकारणी चोवीस तास राजकारण करत आहते. चोवीस तास राजकारण करणे राज्याच्या हितावह बाब नाही. राजकारण हे निवडणुकीपुरते असावे. शिवपुत्र संभाजी या महानाट्याची पूर्वतयारी करण्यासाठी बारकाईने लक्ष द्यावे लागते. माझ्या वेळेच्या नियोजनानुसार तीन महिन्यातून दोन वेळा वेगवेगळ्या शहरात महानाट्य सादर करणे शक्य होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यावरील व्यक्तिरेखा साकारल्याने मला फायदा झाला. मी विविध माध्यमात महाराजाच्या भूमिका सादर करत असल्याने त्या भूमिकेप्रती प्रेक्षकांच्या भावना जोडलेल्या असतात. त्यामुळे वेगळ्या धाटणीच्या भूमिका स्वीकारणे प्रकर्षाने टाळतो.

 

हेही वाचा :शिवपुत्र संभाजी महानाट्याचा प्रयोग आता नाशकात

मतदार संघाकडेही लक्ष

अभिनेता म्हणून विविध चित्रपट, मालिका, नाटक करताना व्यस्त असलो तरी   शिरूर मतदार संघातील कामाकडे दुर्लक्ष होणार याची काळजी घेतली जाते. आठवड्यातील दोन दिवस मतदार संघात असतो.  तसेच वर्षभरातील शंभर दिवस हे संसदेतील अधिवेशनासाठी राखीव असतात. त्यामुळे जनतेने निवडणून दिल्यावर  त्यांच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष होऊ देत नाही.  तसेच गेल्या तीन वर्षात  मतदार संघातील  रखडलेले अनेक प्रश्‍न मार्गी लावले आहेत.   कोणताही मतदर संघ ही  लोकप्रतिनिधी  जाहगिरदारी  नाही.  एका ठराविक कालावधीनंतर मतदार संघात बदल होत असतात.

 

हेही वाचा :मविप्र संस्थेची सामाजिक जबाबदारी कौतुकास्पद – डॉ.अमोल कोल्हे

पहिला प्रयोग हाऊसफुल

शहरात होणार्‍या शिवपुत्र संभाजी या महानाट्याच्या पहिल्या दिवशीचा प्रयोग हाऊसफुल झाला आहे. अडीच तासाचे हे महानाट्य असून, यात दोनशेहून अधिक कलावंताचा सहभाग आहे.  नाशिकच्या थंडीचा विचार करता हा प्रयोग सायंकाळी 6:30 वाजता सुरू करण्यात येणार असल्याचे अभिनेते (Amol kolhe) अमोल कोल्हे यांनी सांगितले.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *