महाराष्ट्र

थर्टी फर्स्ट, केअर मस्ट, कोरोनाची धास्ती कायम

नववर्ष  स्वागताची तयारी

नाशिक ः प्रतिनिधी
नववर्ष स्वागताची सद्या जोरदार तयारी सुरू झाली आहे. वीकएन्डला थर्टी फर्स्ट येत असल्याने तरुणाईसह सर्वांचाच उत्साह शिगेला पोहोचला आहे.नववर्षातील संकल्प,योजनांसह वर्षाचा पहिला दिवस आठवणीत राहण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.त्यासाठी हॉटेल्स व,पर्यटनस्थळे,रिसोर्टस्‌ आदी ठिकाणचे बुकिंग आधीच करण्यात आले आहे.धार्मिक,साहसी पर्यटनासोबत निसर्गरम्य ठिकाणी नववर्षाची पहाट पाहण्यासाठी नाशिककर सज्ज झाले आहेत. कोरोनाच्या धास्तीला काही काळ लगाम घालत योग्य ती खबरदारी घेत नववर्षाचे स्वागत करण्यात येणार आहे.

 

नाशकात कौशल्य विद्यापीठाचे उपकेंद्र

 

हॉटेलिंग व्यावसायिक,डीजे,केटरर्स,सजावट साहित्याच्या दुकानदारांनी थर्टी
ङ्गर्स्टची जय्यत तयारी केली आहे. छोटे मोठे हॉटेल रिसोर्टवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, थीमबेस पार्टीज्‌ आयोजित करण्यात आल्या आहेत.व्हेज नॉनव्हेज पदार्थांसह विशेष मेन्यू ठेवण्यात आले आहेत. अनेक हॉटेल व्यासायिकांनी ऑफसर्र् दिल्या आहेत. कपलडान्स,म्युझिीक,वाद्यांच्या संगतीत थर्टी ङ्गस्टसाठी नियोजन केल जात आहे.

 

पंतप्रधान मोदी यांच्या आई हिराबेन यांचे निधन

 

गेल्या दोन वर्षात कोरोनाचे सावट होते.यंदा थर्टी फर्स्टचा उत्साह जोरात असल्याचे नागरिकांच्या सोशल पोस्ट तसेच पयर्टन हॉटेलींगमध्ये ट्रॅवल्स्‌ बुकिंगवरीन अंदाज व्यक्त होत आहे.प्रत्येकालाच नववर्षाचे स्वागत हटके करण्याकडे कल असल्याने नियोजन सुरू झाले आहे. थर्टी ङ्गस्ट साठी ङ्गुउ,मनोरंजन,प्रवासासह समुद्रकिनारे देवस्थाने यांना पसंती दिली जात आहे.व्हेज नॉनव्हेज ङ्गूड,नृत्य,यासह पार्टीज्‌चे आयोजन करण्यात आले आहे.
शहर आणि आसपासच्या पर्यटनस्थळांवर थर्टी फर्स्ट साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले असून, त्यासाठी राज्यातील धार्मिक स्थळी जाण्याचे नियोजन अनेकांनी केले आहे.

 

आश्चर्यचम ! गुलमोहराच्या झाडात पाण्याचा झरा

 

पोलिसांची राहणार नजर
थर्टी फर्स्टच्या निमित्ताने तळीरांमांवर करडी नजर पोलिस प्रशासनाची राहणार आहे. रात्री उशीरापर्यंत हॉटेल,बार यांना परवानगी दिल्याने प्रशासनावर ताण वाढणार आहे. मद्यधुंद वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे.
मद्यविक्री,निर्मिती आणि वाहतुकीवर पोलिसांची नजर राहणार आहे.

 

डॉ. प्राची पवारांवरील हल्ल्याचे कारण आले समोर

 

नवीन वर्षाचे संकल्प
थर्टी ङ्गस्टला मित्रपरिवार आणि कुटुुंबियांसह संकल्पना (थीमबेस)राबवून नववर्षाचा जल्लोष करण्यात येणार आहे.विविध व्हॉटस्‌ऍप ग्रुप,ज्येष्ठांसह मध्यमवर्गीयांमध्येही नववर्षाच्या स्वागताची तयारी करण्याचे नियोजन सुरू आहे. आरोग्याची खबरदारी घेत नवे संकल्पही करण्यात येणार आहे.

Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

7 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

7 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

8 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

8 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

8 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

8 hours ago