मालेगाव मनपातील लाचखोर सहायक प्रभारी आयुक्तांकडे सापडली एवढी रोकड

मालेगाव मनपातील लाचखोर सहायक प्रभारी आयुक्तांकडे सापडली एवढी रोकड

नाशिक : प्रतिनिधी
मालेगाव महापालिकेतील सहायक प्रभारी कर आयुक्त सचिन सुरेंद्र महाले यांना 33 हजारांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंध क विभागाने रंगेहाथ पकडले. नाला बांधकामाचे टेंडर तक्रारदार यांच्या भावाने घेतले होते. त्याप्रमाणे काम पूर्ण करून केलेल्या नाला बांधकामाचे बिल मंजूर करून देतो असे सांगून बिल मंजूर झाल्यावर स्वतःसाठी व इतरांसाठी चार टक्के प्रमाणे पैसे द्यावे लागतील असे सांगितले होते. बांधकामाचे बिल मंजूर झाल्यानंतर तक्रार दार लाचखोर सचिन महाले यांना भेटण्यासाठी गेले असता 33 हजार रुपये मागितले. ते पैसे स्वीकारताना महाले यांना सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक गायत्री जाधव, हवालदार संदीप वणवे, ज्योती शार्दूल, हवालदार परशुराम जाधव यांच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

घरात सापडले घबाड

लाचखोर सचिन महाले, रा. वर्धमान नगर, मालेगाव यांचे राहते घराची दि. 21/06/2024 रोजी पो.नि. स्वप्निल राजपूत यांनी घरझडती घेतली असता , घरझडती दरम्यान आलोसे यांचे मालेगांव येथील राहते घरी रोख रक्कम रुपये 13,10,200, सोन्याचे तीन क्वाईन व एक सोन्याचा तुकडा वजन एकुण 133 ग्राम असे आढळून आले. पथकाने हे जप्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *