उद्यापासून दोन दिवस हे रेल्वे गेट राहणार बंद

२३ जानेवारी पासून तीन दिवस लासलगाव रेल्वे गेट बंद राहणार

लासलगाव प्रतिनिधी

लासलगाव रेल्वे गेट दरम्यान खराब झालेल्या रस्त्याच्या दुरुस्ती संदर्भात लासलगाव रेल्वे स्टेशन प्रबंधक दिव्यज्योती पांडेय यांना टकळी (विंचूर) ग्रामपंचायत च्या वतीने निवेदन देण्यात आले होते.या निवेदन ची दखल घेत रेल्वे प्रशासनाच्या वतीने तीन दिवस रेल्वे गेट मध्ये खराब झालेल्या रस्त्याचे कामा निमित्त तीन दिवस मेगा ब्लॉक करण्यात आले असल्याचे पत्र लासलगाव ग्रामपंचायत, टाकली विंचूर ग्रामपंचायत,लासलगाव पोलिस ठाणे स्टेशन,आगार प्रमुख लासलगाव,पिंपळगाव नजीक ग्रामपंचायत यांना मध्ये रेल्वे कडून पत्र देण्यात आले आहे

लासलगाव रेल्वे गेट न.105 हे सोमवार 23 मंगळवार,24,बुधवार 25 जानेवारी तीन दिवस गेट मधील खराब रस्त्याचे कामानिमित्त रात्री 10 ते सकाळी 6 वाजे पर्यंत बंद असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने मिळाली आहे या वेळी या रस्त्यावरील पूर्ण वाहतूक बंद राहणार आहे.लासलगाव बाजार समितीमध्ये मनमाड, चांदवड,कळवण,देवळा या तालुक्यातील कंटेनर,मालट्रक ट्रॅक्टर आदि वाहने शेतीमाल विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात ये जा करतात.या रेल्वे गेटमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे झाले असून त्या खड्ड्यांमधून दुचाकी व चार चाकी वाहनांची सातत्याने ये – जा चालू असते या खड्ड्यांमध्ये वाहने अडकून काही छोटे मोठे अपघात झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *