आशा बगे यांना यंदाचा जनस्थान पुरस्कार

आशा बगे यांना यंदाचा जनस्थान पुरस्कार

नाशिक : प्रतिनिधी

 

कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्यावतीने देण्यात येणार येणारा जनस्थान पुरस्कार कादंबरीकार आशा बगे यांना जाहीर झाला आहे. पुरस्काराचे स्वरूप 1 लाख रूपये , मानपत्र,सन्मानचिन्ह असे आहे. पुरस्काराचे वितरण 10 मार्च 2023 रोजी कालिदास कलामंदिर येथे सायंकाळी 6 वाजता होणार आहे.

पुरस्कार निवड समितीमध्ये संध्या नरेपवार , अनुपमा उजगरे,प्रफुल्ल शिलेदार,डाॅ सदानंद बोरसे , अविनाश सप्रे आहेत. अशी माहिती कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे प्रमुख कार्यवाह मकरंद हिंगणे , विश्वस्त हेमंत टकले, विलास लोणारे ,लोकेश शेवडे, अॅड अजय निकम,अॅड .राजेंद्र डोकळे,प्रकाश होळकर, अरविंद ओढेकर यांनी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *