सिन्नर : प्रतिनिधी
मुंबई येथे होत असलेल्या मनोज जरांगे यांच्या मराठा समाजाच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी सिन्नर तालुक्यातून हजारो कार्यकर्ते 200 वाहनांतून मुंबईकडे रवाना झाले.
शुक्रवारी (दि.29) सकाळी 8 वा. शहरातील छत्रपती संभाजी चौक, आडवा फाटा येथून मुंबईच्या दिशेने येथील कार्यकर्ते रवाना झाले. तालुक्यातील पूर्व भागातील वाहने गोंदे येथील टोलनाक्यावरून तर पश्चिम भागातील वाहने भरवीर टोलनाक्यावरून मुंबईकडे रवाना झाले. प्रवास मार्ग, थांब्याचे ठिकाण, प्रवासातील इतर आवश्यक साहित्य याबाबत माहिती देण्यात आली.
त्यानंतर सर्वांनी समृद्धी महामार्गावरील गोंदे टोलनाक्याकडे कूच केली. सोबत तीन दिवसांची शिदोरी नेण्याचे नियोजन करण्यात आले होते. शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष विठ्ठल उगले, भाऊसाहेब शिंदे, हरिभाऊ तांबे, राजाराम मुरकुटे, राजाराम मुंगसे, हिरामण शिंदे, मच्छिंद्र चिने, आर. टी. शिंदे, दत्ता वायचळे, सुभाष कुंभार, नामदेव शिंदे, पंकज जाधव, बाळासाहेब उगले, संपत वाणी, दत्ता सरोदे, सर्जेराव उगले, जयराम शिंदे, रोहिणी कुरणे, सविता कोठुरकर, विजय सातपुते, तुषार गडाख, रामदास खैरनार, पप्पू गोडसे, आनंद सालमुठे, दत्ता हांडे, मयूर खालकर, अनिल थोरात, रवींद्र मोगल, राजेंद्र चव्हाणके, सुरेश पांगारकर, गणेश घोलप, रमेश आमले, रवी सदगीर, ज्ञानेश्वर कुर्हाडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले.