नाशिक

सिन्नरहून हजारो मराठा समाजबांधव मुंबईकडे रवाना

सिन्नर : प्रतिनिधी
मुंबई येथे होत असलेल्या मनोज जरांगे यांच्या मराठा समाजाच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी सिन्नर तालुक्यातून हजारो कार्यकर्ते 200 वाहनांतून मुंबईकडे रवाना झाले.
शुक्रवारी (दि.29) सकाळी 8 वा. शहरातील छत्रपती संभाजी चौक, आडवा फाटा येथून मुंबईच्या दिशेने येथील कार्यकर्ते रवाना झाले. तालुक्यातील पूर्व भागातील वाहने गोंदे येथील टोलनाक्यावरून तर पश्चिम भागातील वाहने भरवीर टोलनाक्यावरून मुंबईकडे रवाना झाले. प्रवास मार्ग, थांब्याचे ठिकाण, प्रवासातील इतर आवश्यक साहित्य याबाबत माहिती देण्यात आली.
त्यानंतर सर्वांनी समृद्धी महामार्गावरील गोंदे टोलनाक्याकडे कूच केली. सोबत तीन दिवसांची शिदोरी नेण्याचे नियोजन करण्यात आले होते. शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष विठ्ठल उगले, भाऊसाहेब शिंदे, हरिभाऊ तांबे, राजाराम मुरकुटे, राजाराम मुंगसे, हिरामण शिंदे, मच्छिंद्र चिने, आर. टी. शिंदे, दत्ता वायचळे, सुभाष कुंभार, नामदेव शिंदे, पंकज जाधव, बाळासाहेब उगले, संपत वाणी, दत्ता सरोदे, सर्जेराव उगले, जयराम शिंदे, रोहिणी कुरणे, सविता कोठुरकर, विजय सातपुते, तुषार गडाख, रामदास खैरनार, पप्पू गोडसे, आनंद सालमुठे, दत्ता हांडे, मयूर खालकर, अनिल थोरात, रवींद्र मोगल, राजेंद्र चव्हाणके, सुरेश पांगारकर, गणेश घोलप, रमेश आमले, रवी सदगीर, ज्ञानेश्वर कुर्‍हाडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले.

 

Editorial Team

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

5 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

5 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

5 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

5 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

5 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

5 hours ago