चांदवड : वार्ताहर
येथील चांदवड-मनमाड रस्त्यावर बुधवारी (दि. 14) सिमेंटच्या विटा वाहून नेणार्या ट्रकचा भीषण अपघात होऊन एकाच कुटुंबातील मायलेकांचा करुण अंत झाला. या काळजाचा थरकाप उडवणार्या घटनेत आईसह तिच्या दोन चिमुकल्यांचा सिमेंटच्या अवजड विटांखाली दबून जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक अपघातामुळे संपूर्ण परिसरात मोठी शोककळा पसरली आहे. मध्य प्रदेशातून रोजगारासाठी आलेल्या एका मजूर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या भीषण अपघातात रोमिता राजेश सोळंकी (वय 25), रियान राजेश सोळंकी (वय 18 महिने) आणि दीपक राजेश सोळंकी (वय 4 वर्षे) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सिमेंटचे ब्लॉक (विटा) घेऊन एक ट्रक मनमाडकडून चांदवडच्या दिशेने जात होता. यावेळी चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा ट्रक रस्त्यावरच पलटी झाला. ट्रकमध्ये बसलेले मजूर कुटुंब सिमेंटच्या शेकडो विटांखाली गाडले गेले. हा अपघात इतका भीषण होता की, रोमिता सोळंकी आणि त्यांच्या दोन लहान मुलांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. या अपघातात अन्य चार जण गंभीर जखमी झाले असून, त्यांची नावे रंजित मोठा सोळंकी (वय 19), राजेश हरसिंग सोळंकी (वय 24), साररी निबू सोळंकी (वय 22) आणि परवेश कल्याणसिंग यादव (वय 22) अशी आहेत. या घटनेची माहिती मिळताच चांदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने युद्धपातळीवर बचावकार्य राबवून जखमींना बाहेर काढले आणि उपचारासाठी चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
Three including Mylek die as truck overturns in Chandwad
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…