नांदगावच्या पोखरी जवळ भीषण अपघातात तीन ठार
सहा गंभीर जखमी
मनमाड : आमिन शेख
: –नांदगाव तालुक्यातील पोखरी शिवारात एका खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इर्टीगा कार व मालवाहतूक करणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात होऊन यात निफाड तालुक्यातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर सहाजण गंभीर जखमी झाले जखमींवर नांदगाव मध्ये प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी मालेगाव येथे हलवण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून येणाऱ्या काळ्या रंगाची इर्टीगा कार क्रमांक (MH 02 E E 2309) ही गाडी येत असताना नांदगाव कडून कासारी कडे जाणाऱ्या मालवाहतूक टेम्पो क्रमांक (MH 41 A U 5316) ला जोरदार धडक दिली. या टेम्पोमध्ये सिमेंटच्या गोण्या भरलेल्या होत्या.या अपघातात इर्टीगा कारचा चालक वैभव वाल्मीक वैताळ (रा. निफाड) यांच्यासह अजून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला अपघात एवढा भीषण होता की घटनास्थळीच तीन जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले. जखमींवर प्रथोमापचार करून पुढील उपचारासाठी तातडीने मालेगाव येथे हलविण्यात आले आहे. पुढील तपास नांदगाव पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संतोष बहाकर करत आहे