मनमाडला गांजा विक्री करताना महिलेसह तिघांना पकडले

मनमाडला गांजा विक्री करताना महिलेसह तिघांना पकडले

मनमाड प्रतिनिधी

मनमाड उपविभागीय पोलीस हद्दीत येणाऱ्या सहा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गांजा,ड्रग्स कुत्ता गोली, यासह व्हाइट पॉवडरसह सर्व अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येत असुन काल मनमाड शहर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या तीन ठिकाणी छापेमारी करून गांजाची विक्री करणाऱ्या एक महिलेसह तिघांना रंगेहाथ अटक करण्यात आली असुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांची ही एक दिवसाची पोलिस कस्टडी घेण्यात आली असुन त्यांचे सोर्स आणि अजून किती लोक काम करतात याबाबत माहिती घेऊन कारवाई करण्यात येणार आहे याशिवाय 15 ऑगस्ट पर्यंत मनमाड उपविभागीय पोलिस हद्दीतुन सर्वच अमली पदार्थ हद्दपार करू असे मत मनमाड उपविभागीय पोलीस अधीक्षक बाजीराव महाजन यांनी व्यक्त केले मनमाड शहर पोलीस ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना महाजन यांनी सांगितले की पोलिस निरीक्षक विजय करे यांना दिलेल्या आदेशानुसार त्यांनी मनमाड शहरातील मुक्तांगण,गवळीवाडा,टक्कार मोहल्ला अशा तीन ठिकाणी एकाचवेळी धाड टाकली व यात धोंडू देविदास व्यवहारे, वय ५० राहणार मुक्तांगण, तुकाराम देवबा गवळी वय ४०,राहणार गवळीवाडा,इरफाना रउफ पठाण वय ३५ राहणार टक्कार मोहल्ला अशा तिघांना अटक करण्यात आली असुन त्यांच्याकडून सुमारे 1 लाखापेक्षा जास्त किंमतीचा साडेदहा किलो गांजा जप्त करण्यात आला आहे त्यांच्यावर अमली पदार्थ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्यांना एक दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली असल्याचे सांगितले हा गांजा नेमका कुठुन आणि कोण पोहचवतो याबाबत आम्ही शोध घेत आहोत. 15 ऑगस्टपर्यंत मनमाड उपविभागीय पोलीस हद्दीत येणाऱ्या मनमाड नांदगाव येवला चांदवड वडनेरभैरव या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व अमली पदार्थ विक्री करणाऱ्यावर कठोर कारवाई करून अमली पदार्थ हद्दपार करू असे मत बाजीराव महाजन यांनी व्यक्त केले आहे.यावेळी पोलीस निरीक्षक विजय करे हेही उपस्थित होते या कारवाई पथकामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत भंगाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक कौशल वाघ, पोलिस उपनिरीक्षक प्रतीक भिंगारदे,सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विजय शिंदे,सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक इमदाद सय्यद,पोलिस हवालदार अशोक व्यापरे, पोलिस हवालदार दिलीप शिंदे,पोलिस हवालदार शिवाजी कापडणे, पोलिस हवालदार पंकज देवकाते,पोलिस कॉन्स्टेबल संदीप झालटे, पोलीस कॉन्स्टेबल रणजित चव्हाण,पोलिस कॉन्स्टेबल राजेंद्र खैरणार,पोलीस कॉन्स्टेबल अभिजित उगलमुगले, महिला पोलीस हवालदार दीपाली आव्हाड,संगिता वाटपाडे, मनीषा उंबरे,मालिनी अंभोरे,प्रतीक्षा वाघ यांचा समावेश होता.

कारवाई करतांना सर्वांचे मोबाईल जमा
मनमाड शहर पोलिस निरीक्षक विजय करे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार त्यांनी शहरातील वरील तिन्ही ठिकाणी रेड करण्यासाठी प्लॅनिंग केला यासाठी आधी टीम निवडली व सर्वांना बोलावून घेतले कोणत्याही प्रकारची रिस्क नको म्हणून त्यांच्याकडून त्यांचे मोबाईल फोन काढुन घेतले सर्वांना गाडीत बसल्यावर स्थळ व कुठं कारवाई करणार हे सांगितले यामुळे कोणत्याही प्रकारचा रिस्क न घेता सर्वच्या सर्व जण रंगेहाथ पकडले गेले त्यांच्या या चलाखीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले.

अमली पदार्थांची तसेच इतर बेकायदेशीर कामाचे माहिती द्यावी

मनमाड शहर परिसरात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरू असले किंवा शहरातील कोणत्याही भागात अमली पदार्थ विक्री होत असेल तर सूज्ञ नागरिकांनी मला फोन किंवा मेसेज किंवा समक्ष भेटून माहिती द्यावी त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल विशेष म्हणजे असे काम करण्यासाठी नागरिकांनी स्वतः पुढे यावे जेणेकरून आपली तरुणाई मोठ्या संकटात जाण्यापासुन रोखली जाईल.
विजय करे,पोलीस निरीक्षक मनमाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *