सिडको: विशेष प्रतिनिधी
गंगापूर रोड वरील गोळीबार प्रकरणात फरार असलेला भाजप नेते सुनील बागूल यांचा पुतण्या अजय बागूल सह तिघांना काल रात्री पोलिसांनी अटक केल्यानंतर आज सकाळी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. गोळीबार घटनेनंतर अजय बागूल फरार झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. अजय बागुल आणि पप्पू जाधवसह एकाच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर या प्रकरणातील मुख्य आरोपी तुकाराम चोथवे आणि अजय बोरिसा हे दोघे अद्याप फरार असून, पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. राणेनगरात राहणाऱ्या सचिन अरुण साळुंके (वय २८) याच्यावर २९ सप्टेंबर रोजी पहाटे गोळी झाडून अपहरण करीत त्याला बोरिसा व चोथवे यांनी मारहाण केली होती. या हल्ल्यानंतर साळुंकेने (दि. ५) रात्री सरकारवाडा पोलिसांत फिर्याद दिली होती. या प्रकरणात या पूर्वी मामा राजवाडे यालाही पोलिसांनी अटक केली आहे.