आयशर-दुचाकी अपघातात सख्ख्या भावांसह तिघे ठार

नांंदगाव-चाळीसगाव महामार्गावर हिरापूरजवळील घटना

पळाशी : वार्ताहर
नांदगाव – चाळीसगाव महामार्गावर हिरापूर (ता.चाळीसगाव) गावाजवळ आयशरने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात सख्ख्या भावांसह तिघे जागीच ठार झाले. ही घटना सोमवारी (दि. 12) रात्री नऊदरम्यान घडली. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर नागरिकांनी गर्दी करत संताप व्यक्त केला. काही काळ रास्ता रोको केल्याने महामार्गावर ये-जा करणारी वाहतूक ठप्प झाली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी समजूत काढून रास्ता रोको मागे घेण्यात आला.
चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव ते हिरापूरदरम्यान रस्त्यावर हिरापूर गावाजवळील नुरानी मशीदजवळ चाळीसगाव-नांदगाव रस्त्यावर सोमवारी रात्री नऊच्या सुमारास भरधाव आयशर व दुचाकीच्या झालेल्या अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की, मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेशासह आणखी एक युवक जागीच ठार झाला. मृतांमध्ये सागर संजय वराडे (वय 27), सोमनाथ संजय वराडे (वय 32), अक्षय बापू पाटील (वय 30, सर्व रा. हिरापूर, ता. चाळीसगाव) यांचा समावेश आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. तिघे दुचाकीस्वार तळेगाववरून हिरापूरकडे येत असताना, नूरानी मशिदीजवळ आयशर कंपनीच्या वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. या अपघात तिघे लांब
फेकले गेले. धडक इतकी जोरात होती की, दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला, तर तिघेही तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.
या घटनास्थळीच तिघांचा मृत्यू झाला. भरधाव वाहनचालक अपघातानंतर फरार झाल्याची माहिती मिळाली. हिरापूरला शोककळा पसरली होती.

Three people, including two brothers, killed in Eicher-two-wheeler accident

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *