नाशिक: प्रतिनिधी
आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पंक्चरवाल्याचा खून करून फरार झालेल्या चार संशयित अवघ्या चार तासांत पोलिसांनी जेरबंद केले आहेत,
यश पवार, प्रसाद पवार एक बालक अशी आरोपीची नावे आहेत, यात एका विधी संघर्षित बालकाचाही समावेश आहे,
नाशिक शहरात वारंवार खुनाच्या घटना घडत असताना पुन्हा एकदा एका तरुणाचा खून झाल्याची घटना आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील जेजुरकर मळा टाकळी परिसरात शनिवार २९ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास घडली होती
सविस्तर माहितीनुसार चार अज्ञात हल्लेखोरांनी एका टायर पंक्चरच्या दुकानात काम करणाऱ्या तरुणावर हत्याराने वार करत त्याची हत्या केली आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, सुमारे ४ पथक गुन्हेगारांच्या मागावर गेल्याचे समजते. मयत युवकाचे नाव गुलाम रब्बानी असे आहे. नाशिक छत्रपती संभाजीनगर रोडवर असलेल्या जेजुरकर लॉन्सजवळ ही घटना घडली. चार संशयितांनी रब्बानीवर वार केले. पोटाला आणि डोक्याला मार लागल्याने तो जागीच ठार झाला. यानंतर हल्लेखोर तेथून पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, किरणकुमार चव्हाण, आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. याचा तपास करत अवघ्या चार तासांत संशयित पकडण्यात पोलिसांना यश आले,
घिबली अॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…
नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…
लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…
शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…
80 फेर्या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…