नाशिक : प्रतिनिधी
मार्चच्या दुसर्या आठवड्यापासूनच उन्हाच्या झळा अधिक तीव्र होत असून, जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईची शक्यता निर्माण झाली आहे. या पाश्वर्र्भूमीवर सिन्नर तालुक्यातून पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्याबाबत तीन प्रस्ताव जिल्हा प्रशासनाच्या टंचाई शाखेकडे पाठविण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सिन्नर तालुक्यातील रामनगर गावासाठी दोन टँकर सुरू करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. मनेगावसाठी टँकर सुरू करण्याचा प्रस्ताव टंचाई शाखेकडे आला आहे. वाढत्या तापमानामुळे विहिरी, कूपनलिका, तसेच लहान जलस्रोतांतील पाण्याची पातळी कमी होऊ लागल्याने काही गावांत पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत ग्रामीण भागातून टँकरच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तविण्यात
येत आहे.
दरवर्षी उन्हाळा सुरू होताच ग्रामीण भागात पाण्याची टंचाई जाणवू लागते. मार्चअखेरपासून एप्रिल व मे महिन्यात ही समस्या अधिक तीव्र होते. परिणामी, ग्रामपंचायतींकडून पाणीपुरवठ्यासाठी टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविले जातात. संबंधित विभागाकडून या प्रस्तावांची पडताळणी करून आवश्यक त्या गावांत टँकर सुरू करण्याचा निर्णय घेतला जातो.
यंदा जिल्ह्यात पावसाळा समाधानकारक झाल्यामुळे धरणांत मागील वर्षाच्या तुलनेत अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र, तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने धरणांतील पाण्याचे बाष्पीभवन वाढत आहे. साठ्यात हळूहळू घट होत असल्याचे चित्र दिसतेे. त्यामुळे उन्हाळ्याच्या पाश्वर्र्भूमीवर ग्रामीण भागातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे, हे प्रशासनापुढे महत्त्वाचे आव्हान ठरणार आहे.
टँकर प्रस्ताव
रामनगरसाठी टँकर प्रस्ताव – 02
मनेगावसाठी टँकर प्रस्ताव – 01
सिन्नर तालुक्यातून एकूण प्रस्ताव – 03
Three proposals for tankers from Sinnar taluka
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…