तीन ट्रेनची एकमेकांना धडक;अपघातातील मृतांची संख्या 233 वर

 900 प्रवासी जखमी मदतकार्य अजूनही सुरू 

ओडिशा: 
ओडिशातील बालसोर येथे तीन ट्रेनची एकमेकांना धडक बसल्याने अपघात झाला. यात हावडा एक्सप्रेस,कोरोमांडल एक्सप्रेस आणि मालगाडीची एकमेकांना धडक बसली.पहिल्यांदा हावडा एक्सप्रेस मालगाडीला धडकली.त्यानंतर मालगाडी कोरोमांडलला एक्स्प्रेसला जाऊन धडकली.

हा अपघात  काल शुक्रवार  (दि.२ रोजी) संध्याकाळी 6 वाजून 51 मिनिटांनी रेल्वेचा मोठा अपघात झाला आहे. देशातील हा आजवरचा सर्वात मोठा अपघात आहे. बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीची एकमेकांना धडक बसली. ही धडक इतकी जोरदार होती की ट्रेनचे अनेक डब्बे मालगाडीवर चढले. सात डब्बे पलटी झाले. चार डब्बे रेल्वे बाँड्रीच्या बाहेर गेले. एकूण 15 डब्बे पटरीच्या बाहेर होते. या दुर्देवी आणि भयंकर अपघातातील मृतांची संख्या 233 वर पोहोचली आहे. तसेच अपघातात आतापर्यंत 900 प्रवासी जखमी झाले आहेत. एनडीआरएफच्या टीमकडून बचावकार्य सुरू आहे.

 सध्या या रुटच्या सर्व ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाखाच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. तसेच गंभीर जखमींसाठी दोन लाख आणि किरकोळ जखमींसाठी 50 हजाराच्या भरपाईची घोषणा करण्यात आली आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *