नाशिक : प्रतिनिधी
महापालिका निवडणूक निर्भयपणे व शांततेत पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनानेही काटेकोर नियोजन केले आहे. मनपा निवडणुकीत 122 जागांसाठी 735 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 13 लाख 60 हजार 722 मतदार असलेल्या नाशिक शहरात मतदानाच्या दिवशी कोणतीही गडबड होऊ नये, यासाठी पोलिसांनी काल शहराच्या विविध भागांतून रूट मार्च काढत आपली सज्जता दाखवून दिली.
शहर पोलिसांनी गेल्या काही दिवसांत नाशिक शहरात ’कायद्याचा बालेकिल्ला’ मोहीम राबवली. निवडणुकीपूर्वी अनेक हिस्ट्रीशीटर असलेल्यांना तडिपारीच्या नोटिसा बजावल्या. अनेकांना निवडणूक होईपर्यंत शहरात बंदी करण्यात आली. पोलीस यंत्रणेने शहरात गेल्या काही महिन्यांत कायद्याचा बालेकिल्ला मोहीम राबवली. अनेकांना ’प्रसाद’ दिला. त्यामुळे निवडणूक प्रचाराच्या काळात शहरात प्रबुद्धनगरचा प्रकार सोडल्यास तसे वातावरण शांतच राहिले. सिडकोमध्ये प्रचार संपण्याच्या एक दिवस आधी झालेल्या प्रकारातही पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
असा आहे बंदोबस्त
नाशिक शहर
पोलीस उपायुक्त ते पोलीस निरीक्षक : 74
सहायक ते उपनिरीक्षक : 203
सहायक उपनिरीक्षक ते अंमलदार : 3,036
होमगार्ड : 1,000
नाशिक ग्रामीण
पोलीस अधिकारी : 61
सहायक ते उपनिरीक्षक : 178
सहायक उपनिरीक्षक ते अंमलदार : 3,272
होमगार्ड : 800
पक्षनिहाय उमेदवार
भाजपा 118
शिवसेना 80
राष्ट्रवादी अप 30
काँग्रेस 22
उबाठा 79
रिपाइं 03
मनसे 30
राष्ट्रवादी श 29
वंचित 53
एमआयएम 07