भाव स्थिरमुळे वाढला तीळाचा गोडवा

मकरसंक्रातीची लगबग, बाजारात दुकाने थाटली
नाशिक ःप्रतिनिधी
मकरसंक्रातीचा सण अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदा तिळाचे भाव स्थिर असल्याने मागणी वाढली आहे. तीळ 150 ते 200 रुपये किलो आणि गुळ 50 ते 60 रुपये किलो आहे. संक्रातीला तीळ गुळाचे लाडू,चिक्की बनविण्यासाठी महिलांची लगबग सुरू झाली आहे.
तीळगुळाचे लाडू आणि चिक्की साखर किंवा गुळात बनविण्यात येतात. बाजारात दुकाने आणि हातगाड्यांवर तिळगुळाचे लाडू,चिक्कीचे पॅकेट आणि सुटे विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत.नोकरदार महिलांची रेडीमेड लाडू चिक्कीला खरेदीला प्राधान्य दिले जात आहे.रेडिमेड लाडू आणि चिक्कीचे एक किलोचे पॅकेट दोनशे ते तीनशे रुपयांपर्यंत आहेत.
तीळगुळ घ्या गोड बोला असे म्हणत एकमेकंाना मकरसंक्रातीच्या शुभेच्छा दिल्या जातात. तीळ आणि गूळ खाण्याला प्राधान्य दिले जाते. थंड वातावरणापासून शरीराचे रक्षण व्हावे यासाठी तीळगुळ खाल्ले जातात
तीळ खाण्यामुळे त्वचा मुलायम राहते आणि कांती सुधारते. तिळाचे सेवन आरोग्यासाठी उपयुक्त असल्याने खास थंडीत तिळगुळाचे लाडू बनविले जातात. सणानिमित्त महिलांचे हळदी कुुंकू समारंभ यंदा उत्साहात साजरे होणार असल्याचे चित्र आहे. काटेरी हलवा,हलव्याचे दागिने आणि तीळगुळ, लाडू, चिक्की यांची बाजारपेठ सजली असून संक्रांतीसाठी खास घालण्यात येणार्‍या काळ्या रंगाच्या कपड्यांचीही बाजारपेठ तेजीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *