चिरतरूण राहण्यासाठी….

तरूण आणि नितळ त्वचा पौष्टिक व सौंदर्यवर्धक आहार महत्वाचा
चिरतरूण राहण्यासाठी केस व त्वचेला पोषण तत्वांचा पुरवठा होईल, अशा जीवनसत्वांचा रोजच्या आहारात समावेश असणे प्रभावकारक ठरेल. चवीला स्वादिष्ट असेल आणि ज्यामुळे सौंदर्य देखील खुलण्यास मदत मिळेल, अशा पद्धतीचा डाएट प्लॅन प्रत्येक जणच चांगल्या प्रकारे फॉलो करू शकतात. या लेखाद्वारे आपण पौष्टिक आणि सौंदर्यवर्धक आहाराशी संबंधीत माहिती जाणून घेणार आहोत. यामुळे तुमच्या आरोग्यासह त्वचा व केसांना पोषण तत्वांचा पुरवठा होण्यास मदत मिळू शकेल.
खालील पदार्थ खुलवतात सौंदर्य :
दही
अॅव्होकॅडो
अक्रोड
बियाणांची भाजी दुपारी नाष्ट्यामध्ये फळांचे सॅलेड मिक्स धान्यांच्या पिठाची पोळी [पौष्टिक अन्नधान्य] भाज्यांचे सॅलेड
केळी
शेंगादाण्याची चिक्की व शेंगदाण्याची रेवडी
असे करू शकतात नियोजन :
नाष्ट्यामध्ये मिक्स धान्याच्या पिठाची पोळी आणि दही खाऊ शकतात. [पोळी सँडवीच भाज्यांचे सलाड चीज दुपारच्या जेवणात खिचडी किंवा वरण भातासह ताकाचे सेवन करू शकता.
संध्याकाळच्या नाष्ट्यामध्ये फळांचे सॅलेड आणि रात्रीच्या जेवणात बियाणांच्या भाजीचा समावेश करू शकता.
सुकामेवा :
फळांचे सॅलेड आणि आक्रोडसह अन्य सुकामेवांचे मर्यादित स्वरूपात सेवन केल्यास केस आणि त्वचा चमकदार होण्यास मदत मिळू शकते.
आठवड्यातून एकदा तरी या पदार्थांचे सेवन करणे, लाभदायक ठरेल.
मिक्स अन्नधान्यांमध्ये जवसाचे पीठ, तांदळाचे पीठ, दळलेल्या डाळी, बाजरीचे पीठ इ. एकत्र करून घरीच पीठ तयार करू शकता. यामुळे तुमच्या शरीराला मोठ्या प्रमाणात पोषण तत्वांचा पुरवठा होण्यास मदत मिळेल.
दह्यामध्ये आरोग्यास पोषक असणाऱ्या बॅक्टेरियांचा समावेश असतो. यामुळे चयापचयाची क्षमताही सुधारण्यास मदत होते. पचनसंस्थेचे आरोग्य निरोगी असेल तर आपल्याला खाल्लेल्या अन्नपदार्थांद्वारे संपूर्ण लाभ शरीराला मिळतात.
याद्वारे तुमच्या शरीराला लोह, कॅल्शियम, झिंक, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, पोटॅशियम इ. आवश्यक पोषण तत्वांचा पुरवठा होईल. याचबरोबर
तन्मना भोजनगतः चित्तः
याचेही पालन करावे : अर्थात
आपले लक्ष खातांना आपल्या भोजनावर केंद्रीत केल्यास याचा प्रभावशाली परिणाम मनावर तसाच पचनक्रियेवरही होतो.
त्वचा व केसांसंबंधीत समस्यांसाठी प्रत्येक रविवारी दुपारी १२ ते १ या कालावधीत मोफत सेमिनारसाठी नक्कीच भेट देऊ शकतात.
डॉ. सपना गावित

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *