तंबाखूच्या पुड्या दिल्या नाही म्हणून तलवारी नाचवल्या

म्हसरूळ गावात स्वयंघोषित भाईंचा प्रताप

पंचवटी : वार्ताहर
स्वयंघोषित भाईने तंबाखूच्या पुड्या मागितल्या त्या दे’ म्हणत म्हसरूळ गावातील जैन मंदिरा जवळील पान टपरीवर एका स्वयंघोषित भाईच्या दोन मित्रांनी पानटपरीवर राहाडा घालून धुमाकूळ घातल्याचा प्रकार घडला आहे . यावेळी पानटपरी चालकाने पुड्या देताना नाक मुरडताच, या दाेघांनी काहीवेळात पुन्हा परत येत हातात धारदार तलवारी आणूण पानटपरीवर तोड फोड करून जीवे मारण्याची धमकी देत पळ काढला. याबाबत टपरीचालक भूषण देशमुख याने  दोन संशयतांच्या विरोधात म्हसरुळ पोलीस ठाण्यात फिर्याद नाेंदविली.
याबाबत माहिती अशी की, भूषण कैलास देशमुख(य ३१ रा. मार्गारेट टाॅवर, शरणपूर गावठाण, कॅनडा कॉर्नर) याच्या फिर्यादीनुसार त्याचे म्हसरुळ गावातील जैनमंदिराजवळ गणेश नावाचे पान स्टाॅल आहे. भूषण पान टपरी चालवत असतांना त्याची ओळख परिसरातील युवराज सोनवणे, वैभव व सिद्धार्थ यांच्याशी झाली आहे. ते नेहमी टपरीवर येऊन गुटखा, बार, सिगारेट घेत असत . पण भूषण २५ जून राेजी सायंकाळी सहा वाजता तवली फाट्यावरुन मोटारसायकलने टपरीवर येत असतांना त्याचा भाऊ हर्षद देशमुख हा टपरी चालवत हाेता. त्याने भूषणला फाेन करुन टपरीवर दोन ते तीन तरुण आले आहेत .त्यांनी सांगितले की ‘युवराज अण्णाने दोन-तीन तंबाखुच्या पुड्या मागितल्या आहे. तेव्हा भूषणच्या फाेनवरुन युवराज सोनवणेचा मित्र भूषणशी बोलला की ‘युवराज आण्णाला तंबाखुच्या पुड्या दे’ तेव्हा भूषणने युवराजच्या मित्राला
रागात सांगत ‘पुड्याच कशाला पूर्ण पुडाच घेऊन जा’ म्हणाला. त्यावेळी भाऊ हर्षद याला उभ्या असलेल्या तरुणांना तीन तंबाखुच्या पुड्या देण्यास सांगितले. त्यानंतर पुड्या घेऊन ते तिघे तरुण निघून गेले. ताेपर्यंत भूषण हा टपरीवर एकटा असतांना रात्री आठ वाजता युवराज सोनवणेचा साथीदार वैभव व सिद्धार्थ हे टपरीवर आले. त्यांनी हातातील तलवार टपरीच्या कांउटरवर आपटून धमकी दिली. ‘तु आमच्या युवराज भाईला शिवीगाळ करतो का ? असे म्हणूण शिवीगाळ केली आणि ‘तु टपरीच्या बाहेर ये, युवराज भाईने आम्हाला तुझा गेम करण्यासाठी पाठवले आहे असे म्हणताच भूषण टपरीबाहेर येत नसल्याने संशयितांनी तलवारी नाचवत धिंगाणा घालत टपरीतील साहित्याचे नुकसान करून पान टपरीतील माल बाहेर फेकुन दिला. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाईगिरी वाढली

पानटपरीवर तंबाखूच्या पुढे देत नाही म्हणून नंग्या तलवारी नाचून धिंगाणा घालण्यात आला. जर पान टपरीतील तरुण बाहेर आला असता तर त्याचा जीव घ्यायलाही भाईच्या कार्यकर्त्यांनी मागेपुढे बघितले नसते. त्यामुळे भाईगिरी वाढत असल्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. अनेक ठिकाणी टवाळखोर भाईगिरी करताना दिसत आहे याकडे जर पोलिसांनी वेळीच लक्ष दिले नाही तर म्हसरूळ तसेच म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीत वाढ व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे पोलीस आता तरी रस्त्यावर उतरून आपला टवाळखोरांच्या बाबतीत पोलीस दाखवणार का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. वेळीच याबाबत पोलीस दक्ष झाले नाही तर भविष्यात मोठा अनर्थ घडू शकतो.

Bhagwat Udavant

Recent Posts

तलवारीचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्यास नाशिकरोड पोलिसांनी ठोकल्या बेड्या

तलवारीचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्यास नाशिकरोड पोलिसांनी ठोकल्या बेड्या नाशिकरोड : प्रतिनिधी तलवारीचा धाक दाखवत…

7 hours ago

विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज : सुवर्णा चव्हाण

आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज : सुवर्णा चव्हाण मनमाड : आमिन शेख आगामी होणाऱ्या…

7 hours ago

नाशिक जिल्हा परिषदेतील वित्त विभागाच्या दोघा अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडले

नाशिक: प्रतिनिधी वेतन पडताळणी करून ती मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात अकरा हजार रुपयांची लाच घेताना …

16 hours ago

राहुल आहेर यांची निवडणूक रिंगणातून माघार केदा आहेर यांच्या उमेदवारीसाठी शिफारस

राहुल आहेर यांची निवडणूक रिंगणातून माघार केदा आहेर यांच्या उमेदवारीसाठी शिफारस काजी सांगवी : वार्ताहर…

1 day ago

बाळ अदलाबदल प्रकरणी मोठी कारवाई, 8 डॉक्टर,1 परिचारिका निलंबित

नाशिक:प्रतिनिधी जिल्हा शासकीय रुग्णालयात काल झालेल्या बाळ अदलाबदल प्रकरणी आरोग्य विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.…

1 day ago

आयुक्तालय हद्दीत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

आयुक्तालय हद्दीत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या सातपूर: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस अधिकार्‍यांच्या…

2 days ago