आज महाशिवरात्र

 

शिवमंदिरे भाविकांच्या गर्दीने फुलणार

 

 

नाशिक : प्रतिनिधी

 

 

आज महाशिवरात्र आहे.. महाशिवरात्रीनिमित्त शहरातील  मंदिर भाविकांसाठी सज्ज झाले आहे.. शिवरात्रीनिमित्त शहरातील विविध परिसरात  असलेल्या शिवमंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई, रंगरंगोटी  करण्यात आली असुन  मंदिराची फुलांनी सजावट करण्यात आली आहे. तसेच मंदिर ट्रस्टच्यावतीने  महाशिवरात्रीच्या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

 

 

कपालेश्वर मंदिर आज  शनिवार (दि. १८) पहाटे चार वाजेपासून रात्री १२ वाजेपर्यंत भविकांना दर्शनासाठी खुले असणार आहे.. सायंकाळी ४ वाजता पालखी काढण्यात येणार आहे. विविध महादेव मंदिरात महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. शहरातील कपालेश्वर, सोमेश्वर, नीलकंठेश्वर यासह शहरातील विविध शिवमंदिरात आज भाविकांची दर्शनासाठी रिघ लागणार आहे.

 

 

 

 

कवटाला महागाईचा फटका

 

 

महाशिवरात्रीच्या दिवशी कवटाला विशेष महत्त्व असते.. त्यामुळे इतर फळासह  कवट खाल्ले जाते.

 

 

एरवी बाजारात क्वचितच दिसणारे कवठ हे फळ महाशिवरात्रीच्या काळात मोठ्या प्रमाणात दिसते. टणक कवच असणारे हे फळ आतून तितकेच चविष्ट असते.  बाजारपेठेत कवट मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत कवटाचे दर 30 ते 40 टक्क्यांनी वाढले आहेत.. दहा ते तीस रुपयापर्यंत एक कवट विकले जात आहे.. नाशिक शहरात वैजापूर भागातून कवट अधिक प्रमाणात  विक्रीसाठी आले आहेत.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *