नाशिक : प्रतिनिधी
माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दीन स्वर्गलोकाहून थोर मला हिचे अभिमान. असे अभिमानाने आपल्या काव्यप्रतिभेने अवघ्या मराठी जनांना सांगणाऱ्या कविवर्य कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस. हाच दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. शाळा ,महाविद्यालये , राजकीय पक्ष यासह विविध संस्था ,प्रतिष्ठान मराठी राज भाषा दि
आपल्या मायबोलीविषयी प्रत्येकाच्या मनात अभिमान आहे… दरवर्षीच मराठी भाषा दिवसाला मराठी भाषेचे कौतूक सोहळा करण्यात येतो. त्यामुळेच आज शहरातील विविध ठिकाणी व्याख्याने ,कविसंमेलन तसेच विविध भाषेचा जागर करणार्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर शाळा ,महाविद्यालयात मराठी भाषा दिवसाचे गेल्या काही दिवसापासून नियोजन सुरू असुन मराठीची थोरवी सांगणारे नाटक ,पोवाडे सादर केले जाणार आहेत.
विशेष करून नाशिक शहरात मराठी भाषा दिनाचे विशेष महत्त्व आहे. कुसुमाग्रज यांचे जन्मस्थान नाशिक असल्याने त्यांचा जन्मदिवस अर्थात मराठी भाषा दिवस नाशकात कायमच उत्साहात साजरा करण्यात येतो.