नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेने 597 कोटींची थकबाकी वसूल करण्यासाठी 23 फेब्रुवारीपासूुन थकबाकीवरील शास्तीवर 95 टक्के सवलत देण्यात आली होती. मात्र, ही मुदत आज, गुरुवारी (दि. 5 मार्च) संपुष्टात येत आहे. दरम्यान, यानंतर थकबाकीदारांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे करसंकलन विभागाने म्हटले आहे.
नाशिक महापालिका आयुक्तांनी करसंकलन विभागाला 2025-26 या आर्थिक वर्षात 260 कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यांपैकी आतापर्यंत 247 कोटींची वसुली झाली आहे. 597 कोटी थकबाकी वसुलीचे आव्हान होते. याकरिताच गेल्या महासभेत शास्तीवर 95 टक्के सूट देण्यात आली होती. दरम्यान, ही मुदत गुरुवारी (दि.5) संपुष्टात येत असल्याने कर विभागाने सहाही विभागांतील 1,400 बड्या थकबाकीदारांना जप्तीच्या नोटिसा धाडल्या जात आहेत. दरम्यान, महापालिकेवर थकबाकी व चालू मागणी, अशी एकूण सातशे कोटींच्या पुढे कराची रक्कम गेली आहे. शहरात सहा लाख 12 हजार मिळकतधारक आहेत. मात्र, यातील अनेकांकडे मालमत्ता कराची थकबाकी आहे. थकबाकीचा फुगवटा प्रत्येक वर्षी वाढताना दिसत आहे. महापालिका निवडणुकीत कर विभागाचे चार-पाच महिने गेल्याने त्याचा फटका करवसुलीवर झाला. त्यानंतर महापालिकेने थकबाकी वसुलीकरिता सहाही विभागांतील थकबाकी वसुली सुरू केली. मात्र, अद्याप 597 कोटींची थकबाकी वसुलीचे आव्हान आहे.
Today is the deadline for paying dues.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…