इच्छुकांसाठी आज अखेरची संधी

अजय बोरस्ते, दिनकर पाटील, विलास शिंदेंनी भरले अर्ज

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिका निवडणुकीत दावेदारी करण्यासाठी आज मंगळ्वारी (दि.30) अखेरचा दिवस इच्छुकांच्या हाती आहे. त्यामुळे मंगळवारी मोठया संख्येने सर्वपक्षीयांची गर्दी उमेद्वारी अर्ज भरण्यासाठी मनपा विभागीय कार्यालयात होणार आहेत. दरम्यान सोमवारी (दि.29) शिंदेसेने उपनेते अजय बोरस्ते, महानगप्रमुख बंटी तिदमे, भाजपचे दिनकर पाटील, शिंदेसेनेचे राहुल दिवे आदींसह युतीतील या दोन्ही पक्षांतील प्रमुख पदाधिकार्‍यांनी उमेदवारी अर्ज भरले. उमेदवारी अर्ज भरताना इच्छुकांनी शक्तिप्रदर्शन केलेे.
गेल्या आठवड्यापासून उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकृतीची प्रक्रिया सुरु आहे. महापालिका प्रशासनाने दहा ठिकाणी इच्छुकांना अर्ज भरण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे. दरम्यान महापालिका निवडणुकीत महायुती होऊन जागा वाटप होइल. अशी शक्यता होती. मात्र, अखेरचा दिवस असूनही भाजपने युतीसाठी सकारात्मकता न दाखवल्याने शिंदेसेनेतील इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरले. भाजप आमदार सीमा हिरे यांची मुलगी रश्मी हिरे, योगेश हिरे यांनी सोमवारी अर्ज दाखल केला. नुकताच शिंदेसेनेत प्रवेश केलेले राहुल दिवे आणि आशा तडवी यांनीहीदेखील उमेदवारी अर्ज दाखल केले.
अर्ज दाखल करताना त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. शहरात निवडणुकीची रंगत वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रभाग क्रमांक सातमधून भाजप आमदार देवयानी फरांदे यांचा मुलगा अजिंक्य फरांदे निवडणुकीत उतरला आहे. त्याचा अर्ज दाखल करण्यासाठी आमदार देवयानी फरांदे या सहकुटुंब पश्चिम विभागीय कार्यालयात दाखल झाल्या होत्या.

यांनी भरले अर्ज

अजय बोरस्ते, हिमगौरी आडके, बंटी तिदमे, मुकेश शहाणे, विलास शिंदे, दिनकर पाटील, मुन्ना हिरे, संध्या कुलकर्णी, भूषण राणे, दीपक बडगुजर, हर्षा बडगुजर, मारुती घुगे, साधना मटाले, भाग्यश्री डेमसे, मंदाकिनी जाधव, अशोक पवार, रमेश गाजरे, संजय नवले, मनोहर बोराडे.

 

Today is the last chance for those interested.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *