त्र्यंबकला आज उटीची वारी
हजारो वारकरी दाखल; संस्थानचे चोख नियोजन
नाशिक : प्रतिनिधी
संतश्रेष्ठ श्रीनिवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान, त्र्यंबकेश्वर येथे वारकरी संप्रदायाचे आद्यगुरू श्रीनिवृत्तिनाथ महाराज यांची उटीची वारी आज शनिवार दि 4 मे रोजी दरवर्षीप्रमाणे उत्साहात साजरी होत आहे. निवृत्तीनाथ संस्थानने चोख नियोजन केले असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष गाढवे यांनी दिली.
सद्गुरू श्री निवृत्तिनाथ महाराज यांच्या समाधीस उन्हाळ्याचा दाह कमी व्हावा, समाधी शीतल रहावी ही श्रद्धा वर्षानुवर्ष वारकर्यांच्या मनात असते. हा श्रद्धाभाव समोर ठेवून वारकरी मोठ्या भक्तीभावाने चंदनाची उटी श्री निवृत्तिनाथांच्या समाधीला लावत असतात.या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात वारकरी श्रीनिवृत्तिनाथ महाराज यांच्या दर्शनासाठी येत असतात. दि. 4 रोजी दुपारी 1:00 वाजता श्रीं ना चंदनाची उटी लावली जाते. त्यानंतर रात्रौ 8:30 ते 10:30 वाजता या उटीच्या वारीचे औचित्य साधून श्रींच्या उटीच्या वारीच्या निमित्ताने संस्थानचे पुजारी तथा विश्वस्त ह.भ.प.श्री.जयंत महाराज गोसावी यांचे हरी कीर्तन होणार आहे. कीर्तन झाल्यानंतर आलेल्या असंख्य भाविकांना द्रव स्वरूपात उटीचा प्रसाद भाविकांना वाटप केले जातो. रविवारी 5 मे रोजी सकाळी ह.भ.प. रंगनाथ महाराज खाडे यांचे काल्याचे कीर्तन होणार असून,सायं 5:00 वा. आद्य ज्योतिर्लिंग भगवान श्रीत्र्यंबकराज यांच्या चरणाशी सद्गुरू श्री निवृत्तीनाथांच्या पादुकांचे दर्शन व श्री निवृत्तीनाथांच्या पादुकांची नगरप्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर महाप्रसाद होतो व यानंतर उटीच्या वारीची व त्या अनुषंगाने राबविण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व इतर संपूर्ण उत्साहात कार्यक्रमांची सांगता होते. यंदा होणारी वारी ही अत्यंत महत्वाची मानली जाते. यंदा सद्गुरू श्री निवृत्तिनाथ महाराज यांचे 751 वे जयंती महोत्सवी वर्ष असून श्रींच्या मंदिर जीर्णोद्धाराचेही वर्ष आहेच म्हणून येणार्या भाविकांच्या व्यवस्थेच्या संदर्भात व्यवस्था प्रशस्त दर्शनबारी,उटीच्या प्रसाद वाटप व्यवस्था करण्यात आलेली आहे उटीच्या वारीसाठी भाविकांनी उपस्थित रहावे,असे आवाहन श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानच्या वतीने अध्यक्ष – नीलेश गाढवे, सचिव सोमनाथ घोटेकर, प्रसिद्धीप्रमुख ह.भ.प.नवनाथ महाराज गांगुर्डे, माधवदास राठी, मुख्याधिकारी श्रीया स्वप्नील देवचक्के आदींनी केले आहे.
खा. वाजे : शिवसेना कार्यालयात मनसे पदाधिकार्यांची उपस्थिती नाशिक : प्रतिनिधी सरकारला हिंदीसक्तीचा निर्णय मागे…
धरण समूहात 47 टक्के; गंगापूर धरणात 56 टक्के पाणीसाठा नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात गेला महिनाभर…
चेन खेचल्याने वीस दिवसांत 98 गाड्यांना विलंब नाशिकरोड : प्रतिनिधी रेल्वेची विनाकारण चेन ओढण्यामुळे 1…
सध्या सुरू असलेल्या पहिलीपासूनच्या त्रिभाषा सूत्रासंदर्भात आपण सर्व मराठी बांधवांनी जाणून घ्यायला हवे आपल्या मराठी…
पारोळा : एका अनोळखी महिलेच्या डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आली होती. यानंतर महिलेचा मृतदेह…
अभोणा ग्रामपालिकेचे दुर्लक्ष, कचरा डेपोसाठी जागा नसल्याचा जावईशोध अभोणा : प्रतिनिधी देशभर स्वच्छ भारत मिशनचा…