आज शिवपुत्र संभाजी महानाट्य

नाशिक : प्रतिनिधी
आज शिवपुत्र संभाजी या महानाट्याचा पहिला प्रयोग सायंकाळी 6 वाजता मोदी मैदान येथे होणार आहे. महेंद्र महाडिक लिखित दिग्दर्शित या महानाट्यात डॉ. अमोल कोल्हे संभाजी महाराजांच्या प्रमूख भूमिकेत आहेत. 18 एकर परिसरात, तीन मजली सेट, घोडे – तोफा आणि जवळ जवळ 200 कलाकारांच्या संचासह हे महानाट्य सादर होणार आहे. विशेष म्हणजे स्थानिक कलावंताचाही  यात सहभाग आहे. आज (दि.21) ते (दि.26) जानेवारी या कालावधीत रोज सायंकाळी 6 वाजता नाशिक तपोवन येथील मोदी मैदान (कै बाबूशेठ केला मैदान) येथे हे महानाट्य सादर होणार आहे.
सशुल्क असणार्‍या महानाट्याची तिकिटं ऑनलाईन book my show वर तसेच महाकवी कालिदास कलामंदिर – शालिमार, रेमंड शॉप – शरणपूर रोड, रेमंड शॉप – बिटको चौक, नाशिक रोड येथे उपलब्ध आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *