सिडको : विशेष प्रतिनिधी
नाशिकरोड परिसरात घराजवळील पाण्याच्या खड्ड्यात पडून 13 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मयताचे नाव प्रतीक मुकेश जमरे (वय 13 महिने, रा. एकलहरे गेट, प्रकाश राऊत यांच्या वीटभट्टीजवळ, नाशिकरोड) असे आहे. ही घटना सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. प्रतीक हा घराजवळ खेळत असताना जवळील पाण्याच्या खड्ड्यात पडला. काही वेळानंतर त्याच्यात कोणतीही हालचाल दिसून न आल्याने नातेवाइकांनी त्याला उपचारासाठी बिटको हॉस्पिटल येथे दाखल केले. उपचार सुरू असतानाच बालरोगतज्ज्ञ डॉ. चव्हाण यांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…