नाशिक

कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी

 

लासलगाव:समीर पठाण

लासलगाव रेल्वे स्टेशन जवळील उड्डाणपूला जवळ राहत असलेल्या पाच वर्षांचा चिमुकला खेळत असताना अचानक पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने हल्ला केला या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे या भटक्या,मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता ग्रामस्थ करत आहे

लासलगाव रेल्वे स्टेशन भागात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असून याकडे टाकळी (विंचूर) ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.या दुर्लक्षित कारभारामुळे भटक्या,मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्याचा चावा घेण्याच्या अनेक घटना घडत असताना लासलगाव रेल्वे स्टेशन जवळील उड्डाणपूला जवळ मोल मजुरी करणाऱ्या नामदेव सोनवणे यांचा मुलगा गणेश हा पाच वर्षीय चिमुकल्याला खेळत असताना अचानक पिसाळलेल्या कुत्र्याने गालाचा चावा घेत लचके तोडल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.या चिमुकल्यावर विंचूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून मोठा खर्च असल्याने घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने पुढील उपचार कसे करावे असा मोठा प्रश्न सोनवणे कुटुंबा समोर उभा राहिल्याचे गणेशची आई संगीता सोनवणे बोलत आहे

डॉक्टरांचे माणुसकीचे दर्शन…

पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात पाच वर्षाचा गणेश हा चिमुकला गंभीर जखमी झाला असून तीन ते साडेतीन लाख रुपये बिल होणार जरी असेल मात्र यात फक्त मी लागणारा खर्च घेत या गरीब कुटुंबाला होईल तशी मदत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे उपचार करणारे खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले

मदतीचे सामाजिक कार्यकर्त्यांकडून आव्हान…

पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या गणेश च्या कुटुंबाची परिस्थिती एकदम हलाखीची असल्याने उपचार करण्यासाठी पैसा नसल्याने कसा उच्चार करावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.या चिमुकल्याला एक हात मदतीचा म्हणून सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब दराडे यांनी पुढाकार घेत सोशल मीडियावर प्रकाश काळे यांचा फोन पे 9011525200 या नंबर वर किंवा A/c नंबर 50100170833755 HDFC BANKL ASALGAONI FSC.HDFC0004128 अकाउंट नंबर वर मदत करण्याची आव्हान केले आहे.

Ashvini Pande

Recent Posts

टायर फुटल्याने बिंग फुटले

टायर फुटल्याने बिंग फुटले सिन्नर : प्रतिनिधी समृद्धी महामार्गावरून वैजापूर येथून मुंबईकडे निघालेल्या एका कारचे‌…

9 hours ago

आता जनावरांची वाहतूक होणार सुरक्षित

आता जनावरांची वाहतूक होणार सुरक्षित सिडको विशेष प्रतिनिधी -भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान (DST) आणि…

9 hours ago

मोहदरी, चिंचोली शिवारात डोंगराला आग लागून २५ हेक्टर गवत खाक

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मोहदरी - चिंचोली परिसरातील वन विभागाच्या डोंगराला अज्ञात कारणास्तव लागलेल्या आगीत…

9 hours ago

बहिणीच्या लग्नाला जमविलेली पुंजी सहीसलामत

आपल्या लाडक्या लहान बहिणीच्या लग्नासाठी मेहनत करुन जतन करून ठेवलेली सुमारे पावणे दोन लाख रुपयांची…

10 hours ago

कला मेळाव्याने शिक्षणाला नवा आयाम

नाशिक : प्रतिनिधी आदिवासी विकास विभागाकडून आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना सामाजिक-भावनिक शिक्षण देण्यासाठी स्लॅम आउट लाउड आणि…

11 hours ago

आरोग्य कर्मचार्‍यांचा सेल्फी हजेरीला विरोध

जिल्हा परिषदेच्या आरोग्याधिकार्‍यांना निवेदन नाशिक : प्रतिनिधी शासनाने ग्रामीण भागात काम करणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांना बायोमेट्रिक…

11 hours ago