शुध्दीपत्राद्वारे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचा पावन होण्याचा प्रयत्न
नाशिक : वार्ताहर
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागावर जागतिक शौचालयदिनानिमित्त जाहीर करण्यात आलेली सेल्फी विथ टॉयलेट ही ऑनलाईन स्पर्धा गुंडाळण्याची नामुष्की ओढवली आहे. यामुळे
या प्रकारामुळे प्राथमिक शिक्षण विभागाची अभ्यासाविना केलेली कसरत समोर आली आहे.
प्राथमिक शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. मात्र यानिमित्ताने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत.
यासंदर्भात दै. गांवकरीने शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे गाऱ्हाणे मांडल्यावर प्राथमिक शिक्षण विभागाला जाग आली. शुध्दीपत्राद्वारे पावन होण्याचा प्रयत्न करीत उपक्रम गुंडाळला असल्याचे आदेश शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याकडून सर्व पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी (मनपा), शिक्षण मंडळ मालेगाव, नाशिक यांना गुरुवार दि. 17 नोव्हेंबर रोजी देण्यात आले. शुध्दीपत्रात सेल्फी विथ टॉयलेट चा उल्लेख नसल्याने हा उपक्रम रद्द करण्यात आला आहे.
दि. 19 नोव्हेंबररोजी जागतिक शौचालय दिन सर्वत्र साजरा करण्यात येतो. याचे औचित्य साधुन सर्व शाळांमध्ये जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये आज दि. 19 नोव्हेंबररोजी सेल्फी विथ टॉयलेट हा उपक्रम राबविण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने दि. 14 नोव्हेंबर रोजी काढले होते. युनिसेफ आणि सी.वाय.डी.ए. पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय स्वच्छ शौचालय अभियान राबविण्यात आहे. यानिमित्ताने सेल्फी विथ टॉयलेट ही स्पर्धा शिक्षण विभागाकडून राबविण्यात येणार होती. मात्र या उपक्रमाला जिल्ह्यातील अनेक शाळांनी, शिक्षकांनी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विरोध केल्याचे बघुन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने या उपक्रमाचा गाशा गुंडाळाला आहे.
यासंबंधीचे सुधारित आदेश शुध्दीपत्राद्वारे गुरुवार दि. 17 नोव्हेंबररोजी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी काढले आहे. प्राथमिक शिक्षण विभागाने हा उपक्रम रद्द केला खरा मात्र या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेविषयी अनेक प्रश्न समोर आले आहेत.
शिक्षक, विद्यार्थ्यांचे गाऱ्हाणे गांवकरीच्या व्यासपीठावर
गांवकरीच्या सेल्फी विथ टॉयलेट च्या वृत्तामध्ये शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी आपले गाऱ्हाणे मांडले. यामध्ये तालुक्यातील शाळांमध्ये टॉयलेटसाठी पाणीच उपलब्ध नसल्याची बाब समोर आली. याचबरोबर मुलींसाठी सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध नसल्याची बाबही समोर आली आहे. अनेक शाळांमध्ये शौचालयांची दुरावस्था झालेली आहे. महिला शिक्षक आणि विद्यार्थींनी यांना टॉयलेट वापरता येत नाही. अनेक ठिकाणी तर टॉयलेटची व्यवस्थाच नाही. काही शिक्षकांनी तर गुरुजींच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगितले. काही विद्यार्थीनींनी मुलींना स्वतंत्र टॉयलेट व्यवस्था आवश्यक असल्याचे सांगितले.
पथनाट्य, चित्रकला स्पर्धां उपक्रमांचे आयोजन
सुधारित आदेशाद्वारे सर्व शाळा व गाव पातळीवर पथनाट्य स्पर्धा (विषय : माझी शाळा माझे शौचालय, शौचालय वापरण्याच्या योग्य पध्दती व मलमुत्र व्यवस्थापन) तसेच चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा (विषय : माझी शाळा, सुरक्षित शौचालय, शौचालय वापरण्याच्या योग्य व आरोग्यदायी पध्दती, स्वच्छ गाव सुंदर गांव, माझ्या स्वप्नातील निर्मल ग्राम) हे उपक्रम राबविण्यात येणार आहे. इयत्ता 4 थी ते 10 वीच्या मुलामुलींसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असुन स्पर्धांचा निकाल 19 नोव्हेंबररोजी शाळा स्तरावर घोषित करण्यात येणार आहे.
घिबली अॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…
नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…
लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…
शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…
80 फेर्या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…