जाण्या चीच अडचण!

सेल्फी विथ शौचालयामुळे शिक्षकांत नाराजी
नाशिक ः देवयानी सोनार
ग्रामीण भागातील शाळांमध्ये शौचालयांच्या स्वच्छतेचा मुद्दा गंभीर असतानाच आता शौचालयासह सेल्फी उपक्रम राबविण्याच्या जिल्हा परिषदेच्या फतव्यामुळे शिक्षकांत नाराजीचा सूर दिसून येत आहे. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास या म्हणीचा प्रत्यय यानिमित्ताने येत आहे.
शाळांमध्ये स्वच्छतागृहे बांधण्यात आलेली असली तरी ती वापरण्यायोग्य नाही. शहरी भागात पाणी सुविधा मुबलक असते. त्यातुलनेत ग्रामीण भागात पिण्याच्याच पाण्याची बोंबाबोंब तर शौचालयांसाठी पुरेसे पाणी कुठून आणणार? त्यामुळे शौचालये असली तरी त्यांची अवस्था शोचनीय झालेली आहेत. शिवाय शाळेतील स्वच्छतागृहाच्या सुविधेबरोबरच मुलींना मिळणार्‍या सॅनिटरी नॅपकिन मिळण्याची प्रतीक्षा असतांना विविध आरोग्यविषयक तक्रारी वाढत असल्याचे चित्र आहे. स्वच्छतेबाबतीत आधीच उदासिनता असल्याने या उपक्रमाबद्दल नाराजीचा सूर उमटत आहे. शौचालय स्वच्छता राखण्यासाठी स्वतंत्र कर्मचार्‍याची तरतूद होणे आवश्यक असतांना पदे रिक्त असल्याची खंतही व्यक्त होत आहे. परिणामी आता शिक्षकांनी स्वच्छता करायची का? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.
जागतिक शौचालय दिनी शाळांमध्ये शौचालयासह सेल्फी हा ऑनलाईन उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी तयारी सुरू झाली आहे.या उपक्रमात स्वच्छ आणि आरोग्यदायी शौचालयासह सेल्फी काढणे असा विषय देण्यात आला आहे. या उपक्रमामुळे शिक्षकही पेचात पडले आहेत
शौचालयासोबत सेल्फी काढण्याचा उपक्रम चांगला आहे. असे मान्य केले तरी मूळ प्रश्‍नाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात शाळांमध्ये शौचालय बांधलेले असले तरी त्याची साफसफाई करण्यासाठी कर्मचारी नाही, पाण्याची वाणवा आहे. त्यामुळे आधी आजार की आधी उपचार ? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.शाळेमध्ये विद्यार्थी जवळपास सहा ते सात तास असतात या कालावधीत विद्यार्थ्यांना बाथरूमला जाण्याची गरज निर्माण होऊ शकते. अशावेळी शाळेमध्ये सुरक्षित शौचालय उपलब्ध नसल्यास विद्यार्थ्यांची आरोग्य विषयक समस्या गंभीर होऊ शकते. संकोचा पोटी नैसर्गिक विधींना शौचालय उपलब्ध नसल्याने प्रतिबंध होतो त्यामुळे पोटाचे आरोग्य बिघडून मानसिक समस्या ही निर्माण झाल्याने मुले शाळेमध्ये येण्याचा कँटाळा करू शकतात यामुळे त्याच्या अध्ययनावर विपरीत परिणाम होऊन सर्वांगीण विकासाला बाधा पोहोचू शकते या सर्व कारणांसाठीच शाळा तेथे शौचालय अत्यंत आवश्यक आहे.
संगीता बाफना
उपाध्यक्षा मुख्याध्यापक संघ नाशिकऑनलाइन शौचालयाची  माहिती मागवली हे माहिती मागवली ती चुकीची आहे शासनाने यासाठी वेतन तरतूद करणे गरजेचे आहे शाळा अनुदान बंद आहे म्हणून त्यासाठी पहिल्यांदा शिक्षण विभागाला शासनाने अनुदान उपलब्ध करून देणे महत्त्वाचा आहे. त्याला मर्यादा ठेवावी त्यानंतर त्यांनी गुगल मॅपच्या माध्यमातून ऑनलाईन पाहणी असे उपक्रम राबवावे. या उपक्रमाला नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाने गेल्या तीन वर्षापासून सातत्याने या शौचालयांसाठी मुलीच्या  सॅनिटरी नॅपकिन मशीनसाठी अनुदानासाठी प्रयत्न सुरू आहेत परंतु अद्याप प्रतिसाद  दिलेले नाही. जवळपास सहा वर्षांपासून मिळालेले नाही. एक टक्क्यांमध्ये मुलांच्या ज्या भौतिक सुविधा असतील त्या सुद्धा पूर्ण होत नाहीत त्यामुळे शासनाने अगोदर या गोष्टींसाठी अनुदान उपलब्ध करून द्यावा.
एस. बी. देशमुख, मुख्याध्यापक, पाताळेश्‍वर विद्यालयशौचालयाच्या संदर्भामध्ये आज जी मोहीम सुरू झालेली आहे. ती अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. केंद्र शासन राज्य शासन या योजनेसाठी खूप मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करत आहे. तरीदेखील ग्रामीण भागामध्ये स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होऊन देखील आज देशांमध्ये शौचालयाकडे उदासीनतेने बघितले जाते. शौचालय स्वच्छ ठेवण्यासाठी देखील प्रत्येकाने काटेकोर प्रयत्न करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी विद्यार्थिनी हे खूप कमी प्रमाणामध्ये शौचालयाचा वापर करतात. म्हणून खूप त्रास हा विद्यार्थ्यांना होत असतो.सिद्धार्थ सांगळे, विद्यार्थी
न्यू इंग्लिश स्कूल ज्युनिअर कॉलेज, वडांगळीशौचालया संदर्भात आज जी मोहीम सुरू झालेली आहे. ती अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होऊन आज देशांमध्ये शौचालयाकडे उदासीनतेने बघितले जाते. खास करून ग्रामीण भागामध्ये शौचालयांची दुरवस्था किंवा शौचालयांची उणीव आढळून येते. गलिच्छ शौचालय असल्यास त्याच्याने मुलांना त्रास होऊ शकतो. म्हणून त्याच्यासाठी पाण्याची ही व्यवस्था असणे आवश्यक आहे.  ग्रामीण भागातील विद्यार्थी विद्यार्थिनी हे खूप कमी प्रमाणामध्ये शौचालयाचा वापर करतात.  शौचालय आढळून येत नाहीत आणि म्हणून खूप त्रास हा विद्यार्थ्यांना होत असतो.
पायल शिंदे, विद्यार्थिनी

अनेक प्राथमिक व माध्यमिक शाळांतून पाणी आणि स्वच्छतागृहांच्या सुविधांचा अभाव आहे. अनेक शाळांमधील स्वच्छतागृहाची नियमित स्वच्छता केली जात नाही त्यामूळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो याबाबीकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे
प्रदीप सांगळे प्राचार्य
उपाध्यक्ष, जिल्हा मुख्याध्यापक संघ नाशिक

शाळेमधे स्वतंत्र मुलींचे शौचालय असणे आवश्यक आहे . मुला -मुलींच्या शौचालयात आंतर असावे सर्व सुविधा त्यात असाव्या शाळेने त्याच्या स्वच्छतेची जबाबदारी काटाक्षाने पार पाडावी . यामुळे आरोग्य चांगले राहील शासनशिक्षण विभागाने यावर काटाक्षाने लक्ष ठेवावे .

साक्षी पाटोळ,
पाताळेश्‍वर विद्यालय पाडळी .

टॉयलेट सोबत सेल्फी उपक्रम राबविण्याचे गणितच लक्षात येत नाही. कर्तव्यावर हजेरीबाबतची सेल्फी प्रयोग म्हणजे गुरुजीच्या विश्‍वासार्हतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण करण्यासारखे आहे. आदिवासी व दुर्गम भागात नेटवर्क समस्या असणारेच  काय? शालेयकामी हजर राहूनही नेटवर्कच्या समस्येमुळे तो गैरहजर  दिसू शकतो.
सुनील कन्नोर, त्र्यंबकेश्‍वर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *