पिंपळगाव टोल नाक्यावरील प्रकार
दिक्षी : पिंपळगाव बसवंत टोलनाका पुन्हा नव्या वादाने चर्चित आला आहे. बुधवारी सायंकाळी टोल भरण्याच्या किरकोळ कारणाहून
महिला टोल कर्मचारी अन पोलीस पत्नीत यांच्यात टोल भरण्यावरून हानामारीचा प्रकार घडला. पिंपळगाव पोलिसांनी रात्री उशिरा केलेल्या मध्यस्थी व माफीनाम्या नंतर वादावर पडदा पाडला.
याबाबत अधिक माहिती अशी की
निफाड तालुक्यातील सीआरपीएफ जवान आपल्या पत्नी व दोन मुलांसमवेत पुणे येथे जात असताना बुधवारी सायंकाळच्या सुमारास पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर आपले शासकीय कार्ड दाखवून खाजगी वाहन सोडण्याची विनंती केली. टोलनाक्यावरील महिला कर्मचाऱ्यांनी तुम्हाला टोल भरवाच लागेल कार्ड चालणार नाही. सदर पोलीस कर्मचाऱ्याने पैसे देऊन टोल भरल्यानंतर वाहनात बसलेली पोलीस पत्नी व महिला टोल कर्मचाऱ्यात शाब्दिक बाचाबाची झाली.वाद विकोपाला गेल्याने दोन्ही महिलांमध्ये टोलनाक्यावर तुंबळ हाणामारी झाली.काही वेळानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचल्यानंतर
टोल कर्मचारी यांनी सुरवातीला गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.पोलीस प्रशासनाने दोन्ही तक्रारदार यांच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर परस्पर वाद मिवटवीत सबुरीचा सल्ला दिला. टोल कर्मचारी यांच्या सयुक्तिक मागणीनंतर माफीनामा लिहून देत वादावर पडदा टाकण्यात आला.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…