नाशिक

नाशिकरोड विभागातील 23 जागांपैकी 10 जागांवर ‘मशाल’ धगधगली

भाजप, शिवसेना शिंदे गटाला रोखले; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकही जागा नाही

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
नाशिकरोड विभागातील 6 प्रभागांतील 23 जागांपैकी 10 जागांवर उबाठा शिवसेनेने विजय मिळवून भाजप आणि शिवसेनेला धूळ चारली. या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला तर भोपळाही फोडता न आल्याने देवळालीच्या आमदार सरोज आहिरे यांच्यासाठी हा मोठा मानहानिकारक पराभव मानला गेला आहे. या निवडणुकीतून नाशिकरोड विभागात ‘उबाठा’ हा सर्वांत मोठा पक्ष ठरला असून, भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. भाजपचे दिनकर आढाव, संभाजी मोरुस्कर, शिवसेनेचे सूर्यकांत लवटे या दिग्गजांना पराभवाचे धनी व्हावे लागल्याने भाजप आणि शिवसेनेला मतदारांनी आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडले आहे.
प्रभाग क्रमांक 20 अ – सतीश आनंदराव निकम (भाजप)- 6087, ब – सीमा राजेंद्र ताजने (भाजप)-7130, क -जयश्री अजित गायकवाड (भाजप)-6639 आणि ड- कैलास सुरेश मुदलियार (शिवसेना)-7365 हे उमेदवार विजयी झाले. या प्रभागात तीन जागांवर भाजपने आपली सत्ता कायम राखली असली तरी या प्रभागात भाजपच्या पॅनलचे कॅप्टन संभाजी मोरुस्कर यांना शिवसेनेचे कैलास मुदलियार यांनी धूळ चारल्याने गड आला पण सिंह गेला, अशी गत भाजपची झाली.
शिवसेनेचे कैलास मुदलियार यांच्या वादळात भाजपचे संभाजी मोरुस्कर यांच्या प्रतिष्ठेचा पालापाचोळा झाला.

प्रभाग 22 मध्ये ‘उबाठा’ची राष्ट्रवादीला धोबीपछाड

अ-वैशाली प्रमोद दाणी (उबाठा) 8908, ब- योगेश लक्ष्मण गाडेकर (उबाठा) 12141, क-संजीवनी संजय हांडोरे (उबाठा) 10215 आणि ड- केशव सीताराम पोरजे (उबाठा) 9791 हे उमेदवार विजयी झाले. या प्रभागात पुन्हा एकदा उबाठा शिवसेनेने आपले वर्चस्व सिद्ध करून राष्ट्रवादीला धोबीपछाड दिली. या प्रभागात देवळालीच्या आमदार सरोज आहिरे यांच्या आश्वासनांना मतदारांनी साफ नाकारल्याचे या निकालातून सिद्ध झाले.

प्रभाग क्रमांक 21 मध्ये भाजपचा झंझावात

प्रभाग क्रमांक 21 अ – कोमल प्रताप मेहरोलिया -(भाजप) 8113, ब – रमेश शंकर धोंगडे (शिवसेना) – 6372, क – श्वेता निर्मल भंडारी (भाजप) – 6618, ड – जयंत अशोक जाचक (भाजप) – 6105 हे उमेदवार विजयी झाले. या प्रभागात भाजपच्या झंझावातात शिवसेना, उबाठा आणि इतर पक्षांच्या उमेदवारांना पराभवाची धूळ चारली. या प्रभागात भाजपाने शिवसेनेचे सूर्यकांत लवटे आणि ज्योती खोले या दोघा माजी नगरसेवकांना पराभूत केले. अवघ्या 358 मतांनी पराभूत झालेले भाजपचे नितीन खोले यांनी फेरमतमोजणीचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना दिला. या प्रभागाची मतमोजणी सुरू असताना ईव्हीएमवरील सीलवरून एका उमेदवाराच्या प्रतिनिधीने सवाल उपस्थित केल्याने वाद होऊन काही काळासाठी मतमोजणी प्रक्रिया थांबवावी लागली. यावेळी मतमोजणी कार्यालयात मोठा गदारोळ निर्माण झाल्याने पोलिसांना हस्तक्षेप
करावा लागला.

‘Torch’ blazing in 10 out of 23 seats in Nashik Road division

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

10 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

10 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

11 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

11 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

11 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

11 hours ago