अभोणा : काश्मीरच्या पहलगाममध्ये अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ अभोण्यात सकल हिंदू समाजबांधवांतर्फे शांती मशाल ज्योत यात्रा काढून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. भारत सरकारने कठोर पाऊल उचलावे. अतिरेक्यांसह त्यांच्या पाठीराख्यांचा त्वरित खात्मा करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या असुरी कृत्याचा अभोणा सकल हिंदू समाजबांधवांतर्फे जाहीर निषेध करण्यात आला.