उद्या साजरी होणार रमजान ईद
लासलगाव:-समीर पठाण
आज बुधवार (दि.10) एप्रिल रोजी चंद्रदर्शन झाल्याने उद्या गुरुवार (दि.11) एप्रिल रोजी मुस्लिम बांधवांची ईद- ऊल – फित्र म्हणजेच रमजान ईद उद्या सर्वत्र साजरी होणार असल्यामुळे मुस्लिम बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.
इस्लामी शाबान महिन्यानंतर १२ मार्च ला पवित्र रमजान महिन्याला प्रारंभ झाला होता.या महिन्यात मुस्लिम बांधवांनी तीस दिवस रोजे (उपवास) केले.तसेच नमाज पठण,कुराण पठण तसेच जकात देणे (दानधर्म करणे) यावर मुस्लिम बांधवांनी भर दिला.या महिन्यात रात्रीची इशाची नमाज झाल्यावर तरविहची विशेष नमाज मुस्लिम बांधवांनी अदा केली. लासलगाव येथील ईदगाह मध्ये उद्या गुरुवारी सकाळी नऊ वाजता मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून ईदची सामुदायिक नमाज अदा करणार आहेत त्याच प्रमाणे नुरानी मशिद,मदिना मशीद रजा नगर या ठिकाणी सुध्दा सकाळी रमजान ईद ची नमाज अदा केली जाणार आहे