महासंग्राम : Nashik Elections

टाउन हॉल धूळखात, समस्यांमुळे नागरिक त्रस्त

लक्ष्यवेध : प्रभाग-11

बकालपणा दूर होईना, शहरात असूनही गावपण जाईना

संमिश्र लोकवस्ती, बहुभाषिक मतदार, शहरातील सध्या तरी चर्चित असलेले सातपूर स्वारबाबानगर, गौतमनगर, कांबळेवाडी, प्रबुद्धनगर, संतोषीमातानगर तसेच महादेववाडी या झोपडपट्टीसह औद्योगिक वसाहती असा सम-विषमतेच्या हिंदोळ्यावर झुलणार्‍या सातपूर शहरातील प्रभाग 11 मध्ये रस्ते, पिण्याचे पाणी, ड्रेनेज, अस्वच्छता, आरोग्य, अशा एकना अनेक समस्या आहेत.
सातपूर गावठाण आणि आजूबाजूच्या तब्बल सहा झोपडपट्ट्यांना सोयीसुविधा मिळाल्यात, परंतु अपेक्षित विकास मात्र होऊ शकला नाही. सातपूर गावातील भाजीविक्रेत्यांचे अतिक्रमण आणि श्री छत्रपती शिवाजी मंडईतील व्यापार्‍यांच्या समस्या प्रलंबित आहेत. गेल्या 25 वर्षांपासून कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेला टाउन हॉल आजही धूळखात पडला आहे. तर औद्योगिक वसाहतीत येणारी-जाणारी अवजड वाहने (कंटेनर्स) डोकेदुखी ठरत आहेत. सातपूर भाग हा शहरात असला तरी प्रभागातील झोपडपट्टी, रस्त्याच्या कडेला झालेले अतिक्रमण, धुळीचे रस्ते त्यावर पडलेले खड्डे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेला बकालपणा यामुळे हा प्रभाग दुर्लक्षित दिसून येतो.
महानगरपालिकेच्या सहाव्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रभागरचना घोषित करण्यात आली आहे. या प्रभागात समस्यादेखील मोठ्या प्रमाणात आहेत.अंतर्गत राजकारणामुळे विकास खुंटल्याची भावना व्यक्त होत आहे. एमआयडीसी याच भागात येत असल्याने तेथील रस्ते, पथदीप, घंटागाडी, साइडपट्ट्या आदी समस्या सुटलेल्या नाहीत. एमआयडीसीत अद्याप भुयारी गटार योजना अमलात आणलेली नाही, अशी उद्योजकांची ओरड आहे. मनपा विभागीय कार्यालयाशेजारीच 25 वर्षांपूर्वी टाउन हॉल उभारण्यात आला असून, अजूनही त्याचे लोकार्पण झालेले नाही. सद्यस्थितीत हा टाउन हॉल धूळखात पडून आहे. सातपूर गावातील मार्केटमधील व्यापार्‍यांच्या समस्या प्रलंबित आहेत. भाजीविक्रेत्यांचे अतिक्रमण हा वादातीत विषय आहे. स्मार्ट सिटीकडे आगेकूच होत असताना गावठाण आणि झोपडपट्ट्यांचा बकालपणा अजूनही कायम आहे. विकासाचा एकही प्रकल्प आलेला नाही, अशी भावना व्यक्त होत आहे.संतोषीमातानगरात शालेय खोल्या नाहीत. एकाच खोलीत चार वर्ग बसतात.
सातपूर स्वारबाबानगर, गौतमनगर, कांबळेवाडी, प्रबुद्धनगर, संतोषीमातानगर तसेच महादेववाडी, सातपूर गाव, मळे परिसर, कामगारनगर, सातपूर कॉलनी परिसरातील काही भाग, औद्योगिक वसाहत भाग परिसरातील नागरिक आपला उदरनिर्वाह चालवत असतात. विशेष म्हणजे, सातपूर शहरात अनेक माजी नगरसेवक, स्थायी समिती सभापती, प्रभाग समिती सभापती अनेक पक्षांचे नेतेगण स्थानिक आहेत. विशेष म्हणजे, सातपूर प्रभाग क्रमांक 11 या भागात भाजी मंडई असल्यामुळे नागरिकांचा येण्या-जाण्याचा वावर जास्त आहे. 2015 व 16 या काळात महानगरपालिकेच्या वतीने अनेक कोटी रुपये खर्च करून त्र्यंबक हायवे रोडला शौचालय बांधण्याची व्यवस्था केली होती. मात्र, ते सुलभ शौचालय धूळखात पडले असून, त्या परिसरात नागरिकांनाही जाण्यासाठी अत्यंत काटेची कसरत करावी लागत आहे. त्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो.

विद्यमान नगरसेवक

                                                                 सलिम शेख,

                                                                   दीक्षा लोंढे,

                                                                   योगेश शेवरे,

                                                                 सीमा निगळ.

प्रभागातील प्रमुख समस्या.
एमआयडीसीत अद्याप भुयारी गटार योजना कार्यान्वित करण्यात आलेली नाही.
एमआयडीसीतील वाढते अतिक्रमण.
एमआयडीसीत भुयारी गटार नसल्याने सांडपाणी रस्त्यावर येते.
25 वर्षांपासून कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेला टॉऊन हॉल धुळखात पडून आहे.
सातपूर गावातील भाजी विक्रेत्यांचे अतिक्रमण.
श्री छत्रपती शिवाजी मंडईतील समस्या प्रलंबित आहेत.
संतोषी माता नगरातील विद्यार्थ्यांसाठी शालेय इमारत नाही.
तरण तलाव सुविधांपासून वंचित
सातपूर गावात जाण्यायेण्यासाठी अडचण.
खोका मार्केट मध्ये रस्त्यांची झालेली दुरावस्था.
एमआयडीसीत डम्पिंग ग्राउंड सदृश्य स्थिती.

प्रभागाची व्याप्ती
महाराष्ट्र हौसिंग कॉलनी परिसर, प्रबुद्धनगर,कांबळे वाडी, एमआयडीसी कॉलनी, संतोषी मातानगर, स्वारबाबा नगर,कांबळेवाडी,महादेववाडी,सातपूर गाव, सातपूर राजवाडा, कामगार नगर, जे.पी.नगर, सिद्धार्थ नगर.
प्रभागातील विकासकामे

प्रभागातील राजकीय स्थिती
आरपीआय, मनसे, भाजपा असा संमिश्र असलेल्या या प्रभागातील राजकीय परिस्थिती सद्या बदलली आहे. आरपीआयचे माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्यावर मोकान्वये कारवाई झाली आहेत. तर दुसरे एक नगरसेवक योगेश शेवरे हे मनसेतून निवडून आले पण निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शिंदेगटात प्रवेश केला. त्यांनी निवडणूक लढविण्याची तयारी चालविली असतानाच गुन्हेगारी प्रकरण त्यांचे कारनामे पिच्छा सोडत नाही. त्यामुळे पोलिस सद्या त्यांचा शोध घेत आहेत. अशा परिस्थितीत प्रभागातील निवडणूक ते लढवतात की नाही? याबाबतच साशंकता आहे. तर मागील वेळेस प्रभाग अकरामध्ये भाजपाला खातेही खोलता आले नव्हते. दीक्षा लोेंढे या आरपीआयकडून तर सीमा निगळ या शिवसेनेकडून आणि मनसेने सलिम शेख आणि योगेश शेवरे यांच्या रूपाने दोन जागा पटकावल्या होत्या. यावेळी सलिम शेख मनसेत आहेत. तर सीमा निगळ यांनी शिंदे गटाची वाट धरली आहे. लोंढे कुटुंबामागे सद्या पोलिसांचा ससेमिरा लागलेला आहे. तरीही दीक्षा लोंढे आरपीआयकडून लढतील. मनसेला नवीन शिलेदार येथे शोधावे लागणार आहेत.

प्रभागातील लोकसंख्या
लोकसंख्या 44875
अनुसूचित जाती 15047
अनुसूचित जमाती 3638

प्रभागातील इच्छुक उमेदवार
सलिम शेख, दीक्षा लोंढे, योगेश शेवरे, सीमा निगळ. सनी पुंडे, भिवानंद काळे, माया काळे, योगेश गांगुर्डे, उर्मिला गायकवाड, काळू काळे, सविता काळे, अरुण काळे, निलेश भंदुरे, शिवाजी भंदुरे, सविता काळे, सुजाता काळे, डॉ.वसुधा कराड, बाळा निगळ,विजय आहिरे, पद्मराज काळे, प्रकाश निगळ, सुनील मौले, अनिल मौले ,तुषार भंदुरे, प्रकाश अंबोरे, संदीप इंगळे, गीता जाधव, सचिन सिन्हा

प्रभागात झालेली कामे

रस्ते काँक्रिटीकरण, योगा हॉल, पथदीप, परिसराची सुरक्षा, भाजी मार्केटचा भव्य डोम, सातपूर शहरातील महापुरुषांचे पुतळ्यांचे सुशोभीकरण, बेटांचे सुशोभीकरण, विविध विकासकामे, गोरगरिबांसाठी लग्नकार्यासाठी हॉल.

नागरिक काय म्हणतात…

भयमुक्त प्रभाग होणे गरजेचे
प्रभाग 11 मध्ये औद्योगिक वसाहत असूनसुद्धा प्रभागामध्ये बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. वाढलेल्या बेरोजगारीमुळे या भागातील युवक वर्ग मोठ्या गुन्हेगारीकड़े वळत आहे. यासाठी युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. शहरात असूनही सातपूर गावठाणचा काहीच विकास झालेला नाही. अंतर्गत रस्ते तसेच ड्रेनेज आणि पाण्याचा प्रश्न आजही कायम आहे. प्रभागात घंटागाडी वेळेवर येत नाही.प्रभागातील उघड्या विद्युत तारांमुळे यापूर्वी अनेक अपघात झालेले आहेत. त्यासाठी या भागातील विद्युत तारा भूमिगत करण्याची गरजेचे आहे.
सनी मंगेश पुंडे, शिवसैनिक, उबाठा

नागरी हिताची कामे नाहीत
नाशिक महानगरपालिकेत तीन वर्षापासून सुविधा नागरिकांना मिळत नाही. विशेष म्हणजे प्रशासकमुळे कुठल्याही प्रकारची कामे नागरिकांच्या हिताचे होतांना दिसत नाही.

-अरुण काळे

 

 

घंटागाडीची वेळ निश्चित नाही

मनपा प्रशासनाच्या वतीने घंटागाडी वेळेवर परिसरामध्ये येत नाही त्यासाठी योग्य तो उपाय मनपा प्रशासनाच्या वतीने करावा. नागरिकांच्या जीवाची हेळसांड होणार नाही, याची काळजी घ्यावी.
-माया काळे

 

 

झाडांची छाटणी करा

नाशिक महानगरपालिका सातपूर विभागाच्या उद्यान विभागाला अनेक वेळा निवेदन दिलेली आहे की सातपूर भागात जे वाढलेले झाडे आहेत ते तत्काळ तिथे छाटणी करून नागरिकांना मोकळा श्वास घेण्यासाठी मदत करावी. मात्र उद्यान प्रशासन कुठल्याही प्रकारचे लक्ष देत नाही.

-विजय अहिरे

 

पाण्याची समस्या बिकट
अनेक दिवसापासून पिण्याच्या पाण्याची तारांबळ होत आहे. मनपा प्रशासनाच्या वतीने पाणी सोडण्याचा टाईम सहा ते सात असून, संबंधी प्रशासन फक्त अर्धा तास पाणी सोडते. त्यामुळे नागरिकांना पाणी भरण्यासाठी त्रास होतोय पाणी सोडण्याचा वेळ वाढवावा.

-दीपक राव

 

प्रभागात खड्डे

प्रभाग 11 च्या परिसरात गेल्या तीन वर्षापासून प्रशासक लागू असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे नागरिकांच्या हिताची काम मनपा प्रशासनाच्या वतीने होत नाही. सातपूर प्रभाग 11 च्या संपूर्ण भागात खड्डे झालेले असून, त्याकडे मनपा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज सध्या निर्माण झाली आहे.

-भिवानंद काळे

 

पथदीप बंद
सातपूर मनपा विद्युत विभागाने रोडवरील बंद पडलेले पथदिप लवकर चालू करावेत. सायंकाळच्या सुमारास पुरुष,महिला हायवेने घरी जात असतात . त्यांना अंधाराचा सामना करावा लागतो. यासाठी पथदीप चालू करावे.

-उर्मिला गायकवाड

Editorial Team

Recent Posts

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्‍याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…

17 hours ago

थेटाळेजवळ वाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…

18 hours ago

वृक्षतोड साधूंसाठी की संधिसाधूंसाठी?

हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…

20 hours ago

सिन्नर नगरपरिषदेसाठी सरासरी 67.65 टक्के मतदान

मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…

21 hours ago

नाशिक जिल्ह्याची ओळख आता ‘बिबट्यांची पंढरी’?

देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…

21 hours ago

रासायनिक खतांच्या दरात पुन्हा वाढ

शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…

21 hours ago