module:1facing:0; ?hw-remosaic: 0; ?touch: (-1.0, -1.0); ?modeInfo: ; ?sceneMode: Auto; ?cct_value: 0; ?AI_Scene: (1, -1); ?aec_lux: 0.0; ?hist255: 0.0; ?hist252~255: 0.0; ?hist0~15: 0.0; ?module:1facing:0; hw-remosaic: 0; touch: (-1.0, -1.0); modeInfo: ; sceneMode: Auto; cct_value: 0; AI_Scene: (1, -1); aec_lux: 0.0; hist255: 0.0; hist252~255: 0.0; hist0~15: 0.0;
सिडको : विशेष प्रतिनिधी
अंबड एमआयडीसीतील गरवारे ते एक्स्लोे पॉइंटदरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. गरवारे टी पॉइंट ते एक्स्लो पॉइंटदरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.े याठिकाणी मोठी कोंडी होत असल्याची तक्रार अंबड औद्योगिक वसाहतीतील उद्योजक, कामगार व वाहनचालकांनी केली आहे.
अंबड एमआयडीसी येथील गरवारे ते एक्स्लो पॉइंटपर्यंतच्या शंभर फुटी रस्त्यावर सुमारे 25 दिवसांपासून रस्त्याचे काम सुरू आहे. या कामामुळे रस्त्याची एक बाजू पूर्णपणे खोदण्यात आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे उर्वरित 50 फुटी रस्त्यावरूनच दुहेरी वाहतूक सुरू असल्याने वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे.
एमआयडीसीतील विविध कंपन्यांमध्ये कच्चा व पक्का माल वाहतूक करणारे कंटेनर तसेच कामावर ये-जा करणार्या दुचाकी व चारचाकींंची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. मात्र, सध्या अरुंद रस्त्यावरून वाहतूक सुरू असल्याने वाहनांच्या तासन् तास रांगा लागत आहेत. अनेकदा वाहतूक ठप्प होत आहे. त्यातच दिवसभर मोठ्या प्रमाणात धूळ उडत असल्याने वाहनचालक व कामगारांना त्रास सहन करावा लागत आहे.
गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या कामामुळे रस्त्याची एक बाजू पूर्णपणे बंद असल्याने प्रत्यक्षात 50 फुटी रस्ताच वापरात आहे. त्यातच काही ठिकाणी अंतर्गत रस्तेही खोदले असल्याने सर्व वाहतुकीचा ताण मुख्य रस्त्यावर येत आहे. या रस्त्याच्या कामामुळे ठिकठिकाणी धुळीचे लोट उडत आहेत. यावर उपाय म्हणून संबंधित ठेकेदाराने धूळ उडू नये म्हणून रस्त्यावर नियमित पाणी फवारावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
उद्योजक ज्ञानेश्वर गोपाळे, प्रमोद वाघ, मनीषा दळवी-आहेर, माजी नगरसेवक अमोल जाधव, निशांत जाधव, संजय गायकवाड, अरुण काळे, अशोक चव्हाण यांच्यासह आजी-माजी कामगार प्रतिनिधी अशोक घुगे, प्रशांत तांबट, प्रीतिश केगे आदींनी ही मागणी केली आहे.
रस्त्याच्या कामामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. त्याचा सर्वाधिक फटका कामावर ये-जा करणार्या दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना, तसेच पादचारी व ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे. धुळीमुळे घसा खवखवणे, खोकला येणे व डोळ्यांची जळजळ होण्याच्या तक्रारी वाढत आहेत.
– डॉ. अविनाश बाविस्कर
नको रे बाबा शहरांतर्गत प्रवास!
सध्या परिस्थिती अशी आहे की, शहरांतर्गत प्रवास करणेही अनेकांना त्रासदायक वाटू लागले आहे. वाहतूक कोंडी, धूळ, खराब रस्ते आणि वाढणारे अपघात यामुळे नको रे बाबा शहरांतर्गत प्रवास, अशी भावना अनेक नाशिककरांच्या मनात निर्माण होत आहे. त्यामुळे प्रशासनाने कामांची नियोजनबद्ध अंमलबजावणी करून वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Traffic chaos on Garware-Exlow Point road
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…