नाशिक ः प्रतिनिधी
शहरात विविध ठिकाणी खोदकाम तसेच दोन दिवसांपूर्वी अशोकस्तंभपरिसरातील वाडा कोसळल्याची घटना घडली परिणामी रस्त्यावरील मातीचा ढिगारा आसपासच्या परिसरात पसरल्याने विविध मार्गाकडून येणारे वाहनचालकांची गर्दी झाल्याने वाहतूक कोंडी होत आहे. अशोक स्तंभ ते मुंबई नाका यामार्गावर सायंकाळच्या वेळात नोकरदार,विद्यार्थी,व्यावसायीक ,ङ्गेरीवाले,यांची गर्दी होत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
नोकरी,व्यवसाय, शाळा,महाविद्यालय निमित्ताने सकाळी आणि सायंकाळी वाहनधारकांची गर्दी होत असते.परंतु शहरात गेल्या काही महिन्यांपासून स्मार्ट सिटी अर्ंतगत विविध कामे सुरू असल्याने बाजारपेठ आणि विविध मार्गावरील व्यावसायीकंाना खोदकामामुळे व्यत्यय येत असून वाहनधारकांची तारांबळ उडत आहे.
दोन दिवसापूर्वी अशोकस्तंभाजवळील स्वीट दुकानात वाहनाच्या धडकेमुळे सायंकाळी वाडा कोसळल्याने बध्यांची गर्दी झाली होती.अजूनही या मार्गावरील वाहतूक विस्कळीत असून गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. मुबई नाका परिसर आणि इंदिरानगर बोगदा येथे मोठ्या प्रमाणात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येतात तरी अनेकदा विरुद्ध मार्गाने येणार्या गाड्यांमुळेही वाहतूक कोंडीत भर पडत आहे.अशोक स्तभ ,मुबई नाका परिसरात वाहतूक पोलिस वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सज्ज असूनही अनेकदा वाहनधारकांची अरेरावी सुरू असते.
वाहतूक पोलिसास चकवा देत असतांना वाहने वेगात पळविणे,विरुद्ध दिशेने वाहने घुसवणे,हातगाडी,मालवाहू कंटेनर,ट्रर्वल्सच्या बसेस,रिक्षाचालक यांच्याबेशिस्त वाहन चालविल्याने वाहतूककोंडीत भर पडत आहे.
सकाळ आणि सायंकाळच्या वेळात वाहतूक सुरळीत व्हावी अशी मागणी नागरीकांकडून होत आहे.
पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…
देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…
गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…
बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…
वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…