काही गाड्या रद्द तर काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल, प्रवाशांचे प्रचंड हाल
नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
राज्यात सुरू असलेल्या पावसाने सर्वत्र दाणादाण उडाली आहे. राज्याची राजधानी मुंबईतही जागोजागी पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी रेल्वे रूळांवर पाणी साचलेले असल्याने नाशिकरोड, पुणे व अन्य मार्गे धावणार्या रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक साफ कोलमडले आहे. त्यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वेने दिली आहे.
नाशिकरोड स्थानकातही प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी विविध स्थानकांवर मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकांबाबत त्वरित माहिती व आवश्यक मदत प्रवाशांना उपलब्ध करून दिली जात आहे. मुंबईत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेमार्गांवर पाणी साचले आहे. त्यामुळे मध्ये रेल्वेच्या वाहतुकीला फटका बसला आहे. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून, काहींचे मार्ग बदलण्यात आले आहे. अनेक गाड्या विलंबाने धावत आहेत.
पंचवटीसह अनेक गाड्यांना प्रचंड विलंब झाला आहे. पंचवटी काल नाशिकरोडहून अर्धा तास उशिरा धावली होती. आज पावसामुळे मुंबईपर्यंत पोहोचू शकली नाही. घाटकोपरला ती थांबवावी लागली. सायंकाळी नाशिकला परतीची गाडी नसल्याने प्रवाशांना घाटकोपरमध्ये गाडीत राहावे लागले. त्यांचे प्रचंड हाल झाल्याची माहिती प्रवासी वेल्फेअर असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण बोरसे यांनी दिली.
पावसामुळे रद्द करण्यात
आलेल्या गाड्या
मुंबईहून सुटणारी गाडी क्रमांक 11011 मुंबई-धुळे एक्स्प्रेस 19 ऑगस्टला रद्द. धुळ्याहून सुटणारी गाडी क्रमांक 11012 धुळे-मुंबई एक्स्प्रेस 20 ऑगस्टला रद्द.
मुंबईहून सुटणारी गाडी क्रमांक 20706 मुंबई-जालना वंदे भारत एक्स्प्रेस 19 ऑगस्टला रद्द. जालन्याहून सुटणारी गाडी क्रमांक 20705 जालना-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस 20 ऑगस्टला रद्द.
अमरावतीहून सुटणारी गाडी क्रमांक 12112 अमरावती-मुंबई एक्स्प्रेस 19 ऑगस्ट रोजी मुंबईला न जाता नाशिकरोडपर्यंत धावेल. तेथून ती परत अमरावतीला जाईल. मुंबईहून सुटणारी गाडी क्रमांक 12111 मुंबई-अमरावती एक्स्प्रेस 20 ऑगस्ट रोजी मुंबईच्या ऐवजी नाशिकरोड येथून आपल्या नियोजित वेळेत सुटेल.
प्रवासी गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
गाडी क्रमांक 12071 मुंबई ते हिंगोली जनशताब्दी नियोजित वेळ 12.10 ऐवजी 16.45 वाजता मुंबई येथून सुटेल. गाडी क्रमांक 12188 मुंबई ते जबलपूर गरीबरथ एक्स्प्रेस नियोजित वेळ 13.30 ऐवजी 17.30 वाजता मुंबई येथून सुटेल. गाडी क्रमांक 12139 मुंबई ते नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस नियोजित वेळ 14.55 ऐवजी 18.30 वाजता मुंबई येथून सुटेल. गाडी क्रमांक 22221 मुंबई ते हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस नियोजित वेळ 16.00 ऐवजी 19.00 वाजता मुंबई येथून सुटेल. गाडी क्रमांक 11001 मुंबई ते बल्लारशाह एक्स्प्रेस नियोजित वेळ 16.35 ऐवजी 20.00 वाजता मुंबई येथून सुटेल. गाडी क्रमांक 12261 मुंबई ते हावडा दुरांतो एक्स्प्रेस नियोजित वेळ 17.15 ऐवजी 20 ऑगस्टला 4.00 वाजता मुंबई येथून सुटेल. गाडी क्रमांक 17612 मुंबई ते नांदेड एक्स्प्रेस नियोजित वेळ 18.45 ऐवजी 21.00 वाजता मुंबई येथून सुटेल. गाडी क्रमांक 01027 दादर ते गोरखपूर विशेष नियोजित वेळ 14.05 ऐवजी 17.00 वाजता मुंबई येथून सुटेल. गाडी क्रमांक 11061 मुंबई एलटीटी ते जयनगर एक्स्प्रेस नियोजित वेळ 11.30 ऐवजी 15.00 वाजता एलटीटी येथून सुटेल. गाडी क्रमांक 12173 एलटीटी ते प्रतापगढ एक्स्प्रेस नियोजित वेळ 16.25 ऐवजी 17.30 वाजता एलटीटी येथून सुटेल.
विविध विषयांवर चर्चा; थकबाकी वसुलीसाठी धोरण राबविण्याचा निर्णय देवळा ः प्रतिनिधी वाजगाव येथील ग्रामसभेत गावात…
जानोरी ग्रामसभेत ठराव; तसा शिक्षक दिल्यास हजर न करून घेण्याचा पवित्रा दिंडोरी : प्रतिनिधी जिल्हा…
वंचित दोनशे शेतकर्यांचा इशारा; कंपनी प्रतिनिधींनी सर्वेक्षण केले नाही कंधाणे : वार्ताहर कंधाणे येथील खरीप…
शासनाच्या बंदीनंतरही सर्वत्र प्लास्टिकच्या फुलांचाच बोलबाला नाशिक ः प्रतिनिधीअवघ्या आठ दिवसांवर आलेल्या गणेश चतुर्थीसाठी बाजारपेठ…
गणेशोत्सवातील राजकीय उत्सव नाशिक : प्रतिनिधी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने इच्छुकांकडून गणेशोत्सवाचा मुहूर्त…
आज जागतिक मच्छर दिन नाशिक : देवयानी सोनार जिल्ह्यात जानेवारी ते जुलै 2025 या सात…