नाशिकरोड : प्रतिनिधी केंद्र सरकारने लष्कर भरतीसाठी जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेविरोधात देशात काही ठिकाणी युवकांकडून विरोध होत आहे . रेल रोको केला जात आहे . त्यामुळे आज दुसऱ्या दिवशीही रेल्वे वेळापत्रकावर परिणाम झाला . काही गाड्या रद्द करण्यात आल्या . तर काही विलंबाने धावत असल्याचे रेल्वेने सांगितले . बिहारवरून येणारी पाटलीपुत्र , पटणा वास्को , पवन या तीन गाड्या रविवारी रद्द करण्यात आल्या . मुंबईहून बिहारला जाणारी भागलपूर , पवन , जनता एक्स्प्रेस , स्पेशल हॉलिडे या रद्द करण्यात आल्या . बिहारवरून येणारी महानगरी एक्स्प्रेस चार तास , गोदान तीन तास उशिराने धावली . काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले . नाशिक रोडमार्गे मुंबईला जाणाऱ्या आणि मुंबईहून उत्तर भारतात सुटणाऱ्या रेल्वेगाड्यांना आंदोलनाचा फटक प्रामुख्याने बसत आहे . बिहारमधील पाटलीपुत्र भागलपूर येथून मुंबईला रवाना होणाऱ्या प्रवासी रेल्वेगाड्या उत्तर भारतातील आंदोलनामुळे काल रद्द करण्यात आल्या होत्या . अग्निपथ योजनेच्या विरोधात आंदोलन असेच सुरू राहिले तर रेल्वेचे वेळापत्रक कोलमडून पडू शकते . गैरसमजातून सुरू झालेले हे आंदोलन आणखीन किती काळ सुरू राहणार हे स्पष्ट होत नसल्यामुळे रेल्वे वेळापत्रकाबाबतही अनिश्चितता आहे . आणि
घिबली अॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…
नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…
लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…
शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…
80 फेर्या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…