नाशिक: त्रंबकेश्वर तहसील कार्यालयातील वाहनचालकाला तब्बल दीड लाखांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले, विशेष म्हणजे यापूर्वी या वाहन चालकाने 50 हजारांची लाच घेतली होती,
तक्रारदाराने मौजे शिरसाठे तालुका इगतपुरी येथे गट क्रमांक 176 मधील शेतजमीन विकत घेण्यासाठी विसारपावती नोटरी केली होती, शेतजमीन संदर्भात तत्कालीन उपविभागीय अधिकारी इगतपुरी, त्रंबकेश्वर येथे वाद चालू होता. या वादाचा निकाल तक्रारदार यांच्या बाजूने करून दिल्याच्या मोबदल्यात2 लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी50 हजार दिले होते. राहिलेलं दीड लाख घेताना चालक अनिल बाबुराव आगीवले नेमणूक वाहनचालक त्र्यंबकेश्वर यांना पथकाने रंगेहाथ पकडले. अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर अधीक्षक नारायण न्याहालदे, उपअधीक्षक नरेंद्र पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप साळुंखे, हवालदार पंकज पळशीकर, प्रकाश महाजन, नितीन कराड, प्रभाकर गवळी यांच्या पथकाने ही कारवाई केली,
लाच नेमकी कुणासाठी?
लाच घेताना रंगेहाथ पकडलेला वाहनचालक याने ही लाच नेमकी कोणत्या अधिकाऱ्यांसाठी घेतली याबाबत चर्चेला उधाण आले आहे, कारण जमिनीच्या वादात तक्रारदार यांच्या बाजूने कोणत्या अधिकाऱ्याने निकाल दिला त्यात चालकाची नेमकी भूमिका याबाबत चर्चेला उधाण आले आहे.
अंबडच्या फडोळ मळा परिसरात सिनेस्टाईल हाणामारी; दोन ते तीन जण जखमी पाहा व्हिडीओ सिडको।…
सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म…
पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम नाशिक : प्रतिनिधी घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे…
मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…
नाशिक: प्रतिनिधी मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे…
जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…