तिघांविरोधात देवस्थानची तक्रार
नाशिक : त्रंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग मंदिरातील पिंडीवर जमा झालेला बर्फ हा पुजाऱ्यांनी स्वतःच आणून ठेवत सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे उघड झाले आहे, पुजाऱ्यांच्या या प्रतापाबद्दल देवस्थान ट्रस्टने तक्रार केली आहे,
30 जून 2022 रोजी ज्योतिर्लिंग पिंडीवर बर्फ जमा झाल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला होता, दरम्यान, त्रंबकेश्वर चे तापमान पाहता बर्फ जमा
होणे शक्य नाही, त्यामुळे चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती, या चौकशी समितीच्या अहवालात सुशांत तुंगार, आकाश तुंगार, उल्हास तुंगार या तिघांनी पिशवीतून बर्फ आणून पिंडीवर ठेवल्याचे उघड झाल्याने देवस्थानने याबाबत तक्रार केली आहे,
त्रंबकेश्वर येथील मंदिर हे बारा ज्योतिर्लिंग पैकी एक आहे, देशविदेशातील भाविक येथे येतात, पिंडीवर बर्फ जमा झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. भाविकांमध्ये याबाबत आश्चर्य देखील व्यक्त होत होते, मात्र हा सर्व बनाव असल्याचे अखेर उघड झाले आहे, दरम्यान, भाविकांच्या श्रद्धशी खेळणाऱ्या या पुजाऱ्यावर काय कारवाई होते? याकडे लक्ष लागून आहे.
“हा भाविकांच्या श्रद्धेशी केलेला खेळ आहे ह्या प्रकरणात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट देऊन, पाहणी केली होती. सीसीटीव्ही फूटेज तपासून, दोषींवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विश्वस्तांकडे पत्राद्वारे केली होती.त्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. तरीही गुन्हा नोंद व्हायला आठ महिने का लागले याची चौकशी होणे गरजेचे आहे. शिवाय गुन्ह्य़ात जादुटोणा विरोधी कायद्याचे कलम लावण्याची विनंती पोलीस प्रशासनाला करण्यात येत आहे.”
– कृष्णा चांदगुडे
राज्य कार्यवाह, महाराष्ट्र अंनिस
हाच तो व्हायरल झालेला व्हिडीओ
सिडको: विशेष प्रतिनिधी घरातील आपआपसांतील वाद पराकोटीला गेल्याने नवऱ्याने रागाच्या भरात मंगळवारी (दि.४) राहत्या घरात…
*हिप हॉप रॅपवर थिरकत फुल टु एन्जॉय करत इलेक्ट्रिफाईंग वातावरणात दोन दिवसीय सुला फेस्टचा समारोप*…
सापुतारा जवळ बस दरीत कोसळून पाच प्रवाशी ठार ४५ प्रवासी जखमी. सुरगाणा : प्रतिनिधी वणी…
दारूच्या नशेत पतीने पत्नीला पेटवले महिला गंभीर जखमी; सातपूरची घटना सातपूर : प्रतिनिधी सातपूर नाशिक…
स्वयंपाक करत असताना गॅस शेगडीवरील काच फुटली, गृहिणी बालंबाल बचावली सिडको : विशेष प्रतिनिधी चुंचाळे…
नांदगाव चाळीसगाव रस्त्यावर कार दुचाकी अपघातात पती-पत्नी ठार ; दोन जण गंभीर जखमी मनमाड :आमिन…