त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात धूप
दाखविण्याची कोणतीच परंपरा नाही
महाआरतीनंतर आ. नितेश राणे यांचा दावा
त्रंबकेश्वर : प्रतिनिधी
येथील ज्योतिर्लिंग मंदिरात संदल मिरवणुकीनंतर धूप दाखविण्याची कोणतीच परंपरा नाही. मी मंदिर विश्वस्तांशी बोललो आहे. तसेच स्थानिकांनीही अशी काही परंपरा नसल्याचे सांगितल्याचे आ. नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आज सकाळी आ. राणे यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेऊन महाआरती केली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्र्यंबकेश्वर मंदिरात 13 मे रोजी जी घटना घडली. त्यावरुन हिंदुंचीच बदनामी सुरू आहे. अनेक प्रकारचे गैरसमज पसरविण्याचे काम सद्या काही मंडळींकडून केले जात आहे. येथे जो उरुस काढला जातो. तो मंदिराच्या बाहेर काढला जातो.मंदिराच्या बाहेरच्या परिसरातून हा उरुस जातो. तेथे ते कुणाला धूप दाखवितात याच्याशी आम्हाला काहीच देणेघेणे नाही. मंदिरात कोण्याच्या येण्यावर आमचा आक्षेप नाही. मंदिरात तुम्हाला दर्शन घ्यायचे असेल तर रांगेत उभे राहुन घ्यावे . मात्र, 13 मे रोजी जे युवक आले होते. त्यांच्या हातात हिरवे झेंडे होते. ते झेंडे घेऊन जाण्याचा ते हट्ट का करत होते. म्हणजेच त्यांचा हेतू चांगला नव्हता, असा आरोपही राणेंनी केला.
पाहा व्हीडिओ