अरुण आनंदकर मनपाचे अतिरिक्त आयुक्त
बडे, सरिता नरके यांची बदली
नाशिक: प्रतिनिधी
शासनाने अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, नाशिकचे अपर जिल्हाधिकारी दत्त प्रसाद नडे यांची मुंबईत रस्ते विकास महामंडळ येथे तर सरिता नरके यांची पुणे येथे जमाबंदी येथे प्रतिनियुक्तीवर तसेच अरुण आनंदकर यांची नाशिक महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली केली आहे, काल रात्री बदल्यांचे आदेश काढण्यात आले,
बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांना तातडीने नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत,