शर्मिष्ठा वालावलकर-घारगे, प्रशांत बच्छाव, खांडवी या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
नाशिक: प्रतिनिधी
गृह विभागाने आज राज्यातील आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक म्हणून नाशिकमधील कारकीर्द गाजवलेल्या शर्मिष्ठा घारगे, वालावलकर यांची बदली छत्रपती संभाजी नगर येथे उपायुक्त म्हणून करण्यात आली असून, त्यांच्या जागेवर ठाणे येथील
भारत तांगडे यांची अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिकचे पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांची बदली धुळे येथे करण्यात आली आहे. तर प्रशांत बच्छाव यांची बदली कोल्हापूर येथे नागरी संरक्षण दल येथे करण्यात आली आहे. पदस्थपनेच्या प्रतीक्षेत असलेले अनिकेत भारती यांची बदली राज्य गुप्त वार्ता विभाग येथे उपायुक्त म्हणून करण्यात आली आहे.