13,800 फूट उंचीचा ट्रेक स्वबळावर सर
दिक्षी : वार्ताहर
हिमालय आणि सह्याद्री हे भारतातील दोन अविष्कार नेहमीच गिर्यारोहण क्षेत्राला आव्हान करीत असतात. हे आव्हान स्वीकारून 12 वर्षीय बालक मंथन भामरेने तिरंग्यासह हिमालय ट्रेक सर केला आहे. 13800 फुट उंचीचा हिमालय त्याने स्बळावर सर केला.
वयाच्या 8 वर्षांपासून सह्याद्रीमधील अनेक गड किल्ले अनेकवेळा त्याने सर केले. त्यानंतर त्याला ओढच लागली. आता चक्क हिमालय ट्रेकच सर केला आहे . मंथनने जल्लोष ग्रुप नाशिक च्या 25 सभासदांसहीत नुकतेच नाशिकहून प्रस्थान केले. कुलू मनालीची भटकंती करून हिमालयाचा 13800 उंचीचा सरफेस ट्रेक गाठला. त्याने आपले पालक रत्नाकर भामरे यांच्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून सराव ट्रेक केला 5 मे रोजी खर्या अर्थाने ट्रेक ला सुरुवात झाली. त्यात कसोल गाव (6500 फुट) 5 मे – कसोल ते ग्रहण गांव (7700 फूट)6 मे – ग्रहण गांव ते मीनथाच (11100 फुट) 7 मे – मीनथाच ते नगारू (12500 फूट) 8 मे – नगारू ते सरपास (13800) ते बिस्केरी (11000 फूट) 9 मे -बिस्केरी ते भंडकथाच (8000फूट)10 मे – भंडकथाच ते बरशैनी(6600फूट) पूर्ण केले या हिमालयिन ट्रेक दरम्यान कमाल तापमान 22 डिग्री आणि किमान तापमान 3 डिग्री इतके होते.मंथन भामरे याला विशेष प्रोत्साहन त्याची आई आजी आणि आजोबा यांनी दिले. मंथनचे वडील रत्नाकर भामरे हे पूर्ण हिमालयीन ट्रेकला त्याच्या सोबत सहभागी होते. या मोहिमेत जल्लोष ट्रेकिंग ग्रुपचे इतर 26 सभासद सामील होते त्यात 25 वर्षाखालील 7 मुले 3 मुली 60 वर्षावरील 2 गृहस्थ 25 ते 60 वयोगटांतील मधील महिला 4 आणि पुरुष 10 आणि जल्लोष ग्रुप चे अध्यक्ष संदीप काकड तसेच सदस्य प्रकाश पाटील, सुदाम धोंगडे, तुषार वीर, मनोहर दरगोडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
लहानपणापासूनच मंथनला माझ्याबरोबर सायकलिंग, गड किल्ले सर करण्याची सवय लागली. त्याच्यात प्रचंड आत्मविश्वास असून त्या आत्मविश्वासाच्या जोरावरच त्याने 13800 फूट उंचीचा हिमालय सरफेस ट्रेक पूर्ण केला.मलाही त्याबद्दल त्याचा अभिमान आहे
– रत्नाकर भामरे, (मंथनचे वडील )
लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…
शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…
80 फेर्या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…
सिडको : विशेष प्रतिनिधी -मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काठे गल्लीतील अनधिकृत स्थळ महापालिका…
नाशिक: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने तिकीट न दिल्यामुळे नाराज झालेल्या कॉंग्रेस प्रदेश प्रवक्त्या हेमलता पाटील…