झाडावर व मोटारसायकलवर योगा
नांदगावच्या शिक्षकांचा अनोखा उपक्रम
मनमाड: आमीन शेख
21 जुन हा जागतिक योगदिन म्हणुन संपूर्ण जगात साजरा करण्यात येतो आपल्या आरोग्यासाठी योग प्राणायाम करणे गरजेचे आहे यासाठी अनेक शाळेत कॉलेज यासह अनेक संस्थामध्ये योग करणे अनिवार्य करण्यात आले आहे नागरिकांनी योग साधनेकडे वळावे यासाठी योग शिक्षक अनेक नानाविध उपाय करत असतात असाच एक अवलिया आहे बाळासाहेब मोकळं हा गेल्या 20 वर्षांपासून योग साधना करतो योग शिक्षक कार्यरत असतांना देखील नागरिकांनी योगसाधना करण्यासाठी व त्याची जनजागृती करण्यासाठी मोकळं धडपडत असतात उद्या होणाऱ्या जागतिक योग दिनाच्या निमिताने त्यांनी आज पूर्वसंध्येला झाडावर व मोटारसायकलवर योग प्राणायाम आसने करून दाखवली याआधी त्यांना योग साधनांसाठी अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत नागरिकांनी योग साधनेकडे वळावे यासाठी आपण नवनवीन प्रयोग करत असतो असे मोकळं यांनी सांगितले.
पहा व्हिडिओ