नाशिक

पाणीटंचाई टाळण्यासाठी आता चरचा पर्याय

साडेबारा कोटींचा खर्च; महासभेवर लवकरच प्रस्ताव

नाशिक : प्रतिनिधी
अल निनोमुळे पावसाने सर्वत्र पाठ फिरवल्याचे चित्र आहे. दरम्यान, नाशिक महापालिकेला 31 ऑगस्टपर्यर्ंत शहराला पाणी पुरवण्याचे आव्हान उभे राहिले आहे. 13 ऑगस्टपर्यंत पुरेल एवढाच जलसाठा गंगापूर धरण समूहात शिल्लक आहे. मात्र, 18 दिवसांची तूट भरून काढण्यासाठी गंगापूर धरणात चर खोदण्याचा पर्याय हाती घेतला आहे. चरद्वारे शहरावरील पाणीटंचाई काही प्रमाणात का होईना कमी केली जाऊ शकते. त्यामुळेच साडेबारा कोटी खर्चून गंगापूर धरणात चर खोदून मृत जलसाठा उचलला जाणार आहे. यासाठी महासभेवर लवकरच यासंबंधीचा प्रस्ताव ठेवला जाईल.
अल निनोच्या संकटामुळे पाऊस लांबण्याची शक्यता गृहीत धरून धरणांतील उपलब्ध पाणी आरक्षणातून 31 ऑगस्टपर्यंत नाशिककरांची तहान भागविण्यासाठी गंगापूर धरणात चर खोदण्याशिवाय पर्याय नसल्याचे चित्र आहे. चर खोदण्यासाठी नेमलेल्या फोरस्ट्रेस या सल्लागार संस्थेने डीपीआर तयार केला आहे. चर खोदण्यासाठी 12 कोटी 50 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्‍या गंगापूर, मुकणे व दारणा धरणांतून महापालिकेला 6,400 दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण प्राप्त झाले आहे. सद्यःस्थितीत नाशिक शहराला धरणातून दररोज 600 दशलक्ष पाणीपुरवठा केला जातो. मुबलक पाणी असूनही शहरातील वाहिन्या नादुरुस्त असल्याने नागरिकांना कृत्रिम टंचाईला सामोरे जावे लागत आहे. गंगापूर धरणाची पाणीपातळी 598 मीटर खाली गेल्यास पंपिंग स्टेशनच्या जॅकवेलपर्यंत पाणी पोहोचत नाही. त्यामुळे धरणात चर खोदून मृतसाठा जॅकवेलपर्यंत आणण्याचा प्रस्ताव आहे. चर खोदण्याच्या मार्गात महाकाय खडक अडथळा ठरत आहे. धरण मातीचे असल्याने हा खडक फोडण्यासाठी डिटोनटर्सचा वापर केल्यास धरणाला हादरा बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे तंत्रशुद्ध पद्धतीने खडकाचा अडथळा दूर केला जाणार आहे. यासाठी महासभेवर लवकरच तसा प्रस्ताव ठेवला जाणार आहे.

आगामी काळात पाण्याची परिस्थिती लक्षात घेता, गंगापूर धरणात चर खोदला जाणार आहे. याद्वारे मृत जलसाठा उचलला जाईल. याकरिता साडेबारा कोटींचा खर्च असून, लवकरच महासभेवर याबाबतचा प्रस्ताव ठेवला जाणार आहे.
– रवींद्र धारणकर, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग, मनपा

 

Trench method now an option to avoid water scarcity.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

14 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

14 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

14 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

14 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

14 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

15 hours ago