उत्तर महाराष्ट्र

त्र्यंबकला बेल वन उद्यानासाठी मिळेना जागा!

बागलाणला उद्याननिर्मिती; विभागात अकरा ठिकाणे निश्चित

बेल वृक्ष संवर्धनासाठी शासनाचे प्रयत्न
धार्मिक ठिकाणी होणार निर्मिती
4440 बेलवृक्षांची लागवड

नाशिक ः देवयानी सोनार

 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने राज्यात बेल वन उद्यानांची निर्मिती करण्याचे काम शासनाने हाती घेतले असून, पाच जिल्ह्यांत दहा हेक्टरहून अधिक जागेत 4 हजार 440 बेलाच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे. धार्मिक स्थळांच्या ठिकाणी जागेच्या उपलब्धतेनुसार बेल वन उद्यान साकारण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात बागलाणच्या दोधेश्वर येथे या बेल वन उद्यान साकारण्यात आले असले तरी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरची महती लक्षात घेऊन येथे बेलवन साकारण्याचे ठरविण्यात आले असले तरी त्यासाठी जागाच मिळत नसल्याने उद्यानाचा प्रस्ताव उमलण्यापूर्वीच कोमेजला आहे.

नाशिकमध्ये धनगर समाज विद्यार्थ्यांसाठी राज्यातील पहिले वसतिगृह

वृक्ष संवर्धन आणि लागवडीसाठी शासनामार्फत बेलवन,पंचायत वन,आणि अमृत वन अशी योजना राबविण्याचे उद्दिष्ट शासनाने ठेवले आहे. त्यानुसार वन विभागामार्फत धार्मिक स्थळांच्या ठिकाणी बेल वन उद्यानांची निर्मिती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. जिल्ह्यातील पहिले बेल वन उद्यान बागलाण तालुक्यातील दोधेश्वर मंदिराच्या परिसरात अर्धा एकरात साकारण्यात आले आहे.

भुजबळ फार्म भोवती बंदोबस्तात वाढ

सटाण्यापासून पाच ते सात किमी अंतरावर दोधेश्वर देवस्थान आहे. येथील महंतांच्या सहकार्याने पाण्याची सोय करण्यात आली आहे. जैवीक चर करण्यात आला आहे.घायपात कंद लावण्यात आले आहेत. बेलाची130 झाडे ,बोर 40,पळस 10,चाफा 10 आणि पारिजातकाचे 10 असे अर्धा हेक्टरमध्ये 200 झाडे लावण्यात आली आहेत. देवस्थान असल्याने वड पिंपळही श्रमदानाद्वारे लावण्यात आले आहे. बेस आणि ग्रीड लाईनमध्ये 14 वडाचे आणि पिंपळाचे सात झाडे लावण्यात आल्याची माहिती वन परीक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे यांनी दिली.
बेल वृक्षाची पाने, मुळे, फळे व साल या सर्वांचा उपयोग विविध रोगांवर उपचार करण्यासाठी केला जातो. बेल वृक्षाचे महत्व इंटरनॅशनल युनियन फॉर द कॉन्सव्हेशन ऑङ्ग नेचर,नॅचरल रिसोर्सेस असे घोषित केलेले आहे. त्यामुळे या सर्व बाबी विचारात घेऊन अमृत महोत्सवी वर्षानिर्मित्त राज्यात बेल वन उद्यानांची निर्मिती करण्याचे प्रस्तावित होते.

नाशिक स्फोटांनी हादरले

बहुपयोगी असलेल्या बेलाच्या वृक्षाचे औषधीय व पर्यावरणीय दृष्टया महत्व मोठे आहे. मात्र, सद्यस्थितीत बेल वृक्षांची संख्या झपाटयाने कमी होत असल्यामुळे या वृक्षाच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करणे हा अमृत महोत्सवी बेल वन तयार करण्यामागील मुख्य उद्देश आहे. त्यानुषंगाने वन विभागाने या अमृत महोत्सवी कार्यक्रमात पुढाकार घेऊन राज्यात धार्मिक स्थळांच्या ठिकाणी भाविकांना उपयुक्त असणार्‍या औषधी वनस्पती बेल, सीताफळ, अशोक, रुद्राक्ष, बोर, पळस, पारिजात, पांढरा चाफा, पांढरी कण्हेर, पांढरा धोतरा व स्वस्तिक या वृक्षांची लागवड करून बेल वन उद्यानांची निर्मिती करण्याचे उदिष्ट शासनाने ठेवले आहे.

 

सुषमा अंधारे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न

बेल वनासाठी त्र्यंबकेश्वर योग्य जागा
नगर,धुळे,जळगाव,नंदुरबार,नाशिक या पाच जिल्ह्यात बेलवन उद्यान साकारण्यात येणार आहे. त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असल्याने धार्मिक महत्व अधिक आहे. जगभरातून भाविक दर्शनसाठी येत असतात.देवस्थानासाठी लागणारी फुले, बेल आणि इतर वृक्षांचे महत्व लक्षात घेता बेल वन उद्यान निर्मितीचा शासन आदेश नुकताच जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार त्र्यंबकेश्वरला बेल वन उद्यान पुढील वर्षापर्यंत साकारले जाण्याची शक्यता आहे. मात्र, त्यासाठी जागा मिळणे गरजेचे आहे.

 

नाशिक त्र्यंबकेश्वरला जागेची अडचण आल्याने बेल वन उद्यान साकारण्यास विलंब होत आहे. प्रादेशिक विभागाकडे जागेची मागणी केलेली आहे. प्लांटींगचा निधी आणि मंजुरी येण्यास विलंब झाला होता. आता जागा उपलब्ध झाल्यास पुढील वर्षी नियोजन करून बेल वन उद्यान साकारण्यात येईल.
पाच जिल्हयात भेटी देणे सुरू आहे.
प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनीता सिंग यांनीही नगर जिल्ह्यात भेटी दिल्या आहेत. तसेच जे रोपन होत आहेत तेथे वरिष्ठ अधिकारी भेट देत आहेत.रोपे जगविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
गजेंद्र हिरे
(वनसंरक्षक,सामाजिक वनीकरण नाशिक)

चांदोरीजवळ शिवशाहीला आग

विभागनिहाय बेल वन आणि कंसात लावलेली रोपे
नाशिक 1
दोधेश्वर : (200)
नगर : 3
पारनेर (400)
कोपरगाव (160)
नेवासा (160)
धुळे : 2
साक्री(400)
शिरपूर (400)
जळगाव : 2
एरंडोल400)
भुसावळ (400)
नंदुरबार : 2
नंदुरबार(800)
चिंचपाडा (800)

Devyani Sonar

Recent Posts

साप्ताहिक राशिभविष्य

पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…

22 hours ago

असामान्य अभिनेत्री काळाच्या पडद्याआड

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…

22 hours ago

गणेशोत्सवात ‘गोदावरी महाआरती’ ठरणार नाशिकचा अभिमान

देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…

23 hours ago

पालकमंत्रिपदाचा वाद चिघळला

गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…

23 hours ago

पिनाकेश्वर घाटात ट्रॅक्टर ट्रॉली दरीत कोसळून दोन महिला ठार

बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…

23 hours ago

निफाड उपविभागात साडेतीन हजार स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरु

वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…

23 hours ago