त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
येथे शिवनेरी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयासमोर शनिवारी दुपारी शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांच्यासह बंडाळी करणा-या आमदारांचा निषेध करत घोेषणाबाजीने परिसर दणाणून सोडला. यावेळेस त्र्यंंबकेश्वर शहर आणि तालुक्यातील शिवसैनिकांनी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत कायम असल्याचे सांगितले. तसेच गद्दारांना मतदार धडा शिकवतील असे मत व्यक्त केले.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजारी असतांना अशा प्रकारे त्यांना यातना देण्याचे काम करणा-यांना कदापि, माफ केले जाणार नाही.याची शिक्षा त्यांना जरूर मिळेल तसेच त्यांना फूस लावणारे आणि खेळ करनारे यांना मतदारांनी ओळखले आहे. त्यांना देखील याची परतफेड करावी लागेल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळेस तालुका प्रमुख रवी वारूणसे,शहर प्रमुख सचिन दीक्षित,शहर संघटक नितीन पवार, शिवसेना गटनेत्या नगरसेविका मंगला आराधी, महिला तालुका प्रमुख नगरसेविका कल्पना लहांगे,कल्पेश कदम,सचिन कदम, सतीश कदम,बाळासाहेब गाजरे,सचिन कर्पे यासह मोठया संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
चांदवड, सुरगाणा, मालेगाव तालुक्यात प्रत्येकी एका गटाने वाढ, संख्या 74 वर नाशिक : प्रतिनिधी जिल्हा…
कुपोषित बालकांच्या आरोग्य संवर्धनासाठी जिल्हा परिषदेचा उपक्रम नाशिक : प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या पोषणदूत उपक्रमांतर्गत अंतर्गत…
उर्वरित सव्वाशे कोटींच्या कामांना मात्र हिरवा कंदील नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने…
रात्रीच्या वेळी घरांच्या कड्या वाजवून दहशत माडसांगवी : वार्ताहर लाखलगावसह परिसरात चोरांच्या दहशतीमुळे लाखलगावचे ग्रामस्थ…
लग्न न करता एकत्र राहण्याचे (लिव्ह इन रिलेशनशिप) फॅड अलीकडे खूप वाढले आहे. विशेषतः शहरात…
नाशिक ः काल शेवटच्या श्रावणी सोमवारी रिमझिम पावसातदेखील जवळपास लाखभर शिवभक्तांनी श्री कपालेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी…