वज्रलेपासाठी त्र्यंबकेश्वर मंदिर ५ जानेवारी ते १२ जानेवारी पर्यंत बंद राहणार
त्र्यंबकेश्वर:
बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे पिंडीची झीज रोखण्यासाठी वज्रलेप तसेच मंदिराच्या देखभालीच्या कामासाठी गुरुवार दि. ५ जानेवारी २०२३ ते गुरुवार दिनांक १२ जानेवारी २०२३ पर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे.याकालावधीत भाविकांना त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश बंद करण्यात येणार असून दर्शन घेता येणार नाही. मंदिरातील गर्भ गृह पिंडीची, पाळची होत असलेली झीज थांबविणे व महादेवाच्या पिंडीचे संवर्धन करण्यात येणार आहे.सदरचे संवर्धन काम भारतीय पुरातत्त्व खात्यामार्फत करण्यात येणार आहे.यासाठी भाविकांनी सहकार्य करावे असे अवाहन देवस्थान ट्रस्ट चेअरमन व विश्वस्त मंडळाने केले आहे. या साठी काम लेपन होणार आहे.मंदिर भाविकांसाठी आठ दिवस बंद राहणार आहे याची भाविकांनी नोंद घ्यावी असे आवाहन मंदिर ट्रस्टने केले आहे.
नाशिक: प्रतिनिधी शहरात टवाळ खोरांनी मोठा उच्छाद मांडला असून, वाहनांच्या काचा फोडणे, तोडफोड करणे, कोयता…
नाशिक: प्रतिनिधी राज्यातील आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या आज शासनाने बदल्या केल्या. नाशिकचे पोलीस अधीक्षक म्हणून पालघर…
नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…
भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…
छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…
12 राशींचे राशीभविष्य मेष रास मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…