अगरतळा: त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव यांनी आज तडकाफडकी राजीनामा दिला. भाजपाचे मोठे नेते अशी त्यांची त्रिपुरा राज्यात प्रतिमा आहे. असे असताना त्यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे राष्ट्रीय राजकारणात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वीच बिप्लबकुमार देव यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. पक्षाने आदेश दिल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. आज सायंकाळी भाजपाची बैठक होणार असून, त्यात नव्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.